डॉ. केतकीताई पाटील यांच्या संकेतस्थळाचे गोदाआजींच्या हस्ते उदघाटन

0
69

जळगाव : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधत गोदावरी फाऊंडेशन संचालिका डॉ केतकीताई पाटील यांच्या https://www.drketkitaipatil.com संकेतस्थळाचे उदघाटन आज बुधवार दिनांक ३ जानेवारी रोजी सेवानिवृत्त शिक्षिका ९० वर्षीय श्रीमती गोदावरी पाटील (गोदाआजी) यांच्या शुभहस्ते करण्यात आले.  जनसामान्यांच्या सेवेचे बाळकडू घरातूनच मिळालेल्या डॉ केतकीताई पाटील या आता डिजिटल युगात संकेतस्थळाच्या माध्यमातूनही सर्वसामान्यांपर्यंत पोहचणार आहे, त्यानिमित्त गोदावरी आजी यांनी डॉ केतकी पाटील याना भरभरून आशीर्वाद दिले.

जळगाव शहरातील भास्कर मार्केट येथे असलेल्या डॉ केतकी पाटील फाऊंडेशन कार्यालयात संकेतस्थळ उदघाटन कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी  गोदावरी फाऊंडेशन प्रेरणास्तोत्र श्रीमती गोदावरी पाटील,  अध्यक्ष डॉ उल्हास पाटील, सचिव डॉ वर्षा पाटील, संचालिका डॉ केतकी पाटील, हृदयविकार तज्ञ् डॉ वैभव पाटील, श्री प्रदीप भिरूड आदी उपस्थित होते.  मागील दीड ते दोन वर्षात प्रत्यक्षरित्या जाऊन डॉ केतकी पाटील यांनी जनतेशी संपर्क साधला असून या पुढेही जनसामान्यांमध्ये त्या सहभागी होणार आहे.

मात्र डिजिटल युगात वावरताना जगाच्या पाठीवरील प्रत्येकाशी त्यांचा संपर्क व्हावा, आरोग्य सेवेची,  समाजकार्याची  माहिती उपलध करून द्यावी, स्वतः बद्दलची माहिती व आगामी काळातील कामाचे नियोजन याची सविस्तर माहिती https://www.drketkitaipatil.com संकेतस्थळावरून आता मिळणार आहे. यावेळी डॉ केतकी ताई पाटील यांनी संकेतस्थळाची माहिती गोदावरी आजी यांना दिली. या प्रसंगी आपल्या नातीचे कार्य पाहून गोदावरी आजीनी समाधान व्यक्त केले तसेच आगामी काळात अशीच सेवा कर, असे आशीर्वादही दिले. 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here