भुसावळ रेल्वे स्थानकावरही डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय २४ तास सेवा देणार रेल्वेस्थानक ओपीडीचे लोकार्पण

0
129

भुसावळ : भुसावळ रेल्वेस्थानकावरही आता डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय प्रवाश्यांना २४ सेवा देण्यासाठी सज्ज झाले आहे. आज रेल्वेस्थानक ओपीडीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी रेल्वेच मुख्य वैद्यकिय अधिक्षक डॉ.आनंद कांबळे, डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे व वैद्यकिय संचालक डॉ.एन एस आर्विकर,अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके,डॉ. सुभाष बडगूजर, डॉ कश्यक,पवनकुमार वरीष्ठ मंडल अधिकारी, धिरेंद्र कुमार वरीष्ठ वाणिज्य प्रबंधक,गोदावरी परिवारातील रूग्णालय व्यवस्थापक अशोक भिडे, बांधकाम विभाग प्रमुख संजय भिरूड इ मान्यवरांच्या हस्ते फित कापून या ओपीडीचे लोकार्पण करण्यात आले.

गेल्या दिड वर्षापासून जळगाव स्थानकावरही याचप्रकारे डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालया उकृष्ट सेवा देत असून याचेच फलित म्हणून भुसावळ स्थानकावरील प्रवाशांसाठी देखिल सेवा सूरू करण्याचा निश्‍चय रेल्वे प्रशासनाने केला आणि ही सेवा डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाला प्रदान केली यावेळी मान्यवरांचे स्वागत पुष्पगु च्छ देवून करण्यात आले. मार्गदर्शन करतांना मान्यवरांनी जळगाव प्रमाणे भुसावळकर प्रवाशांना उकृष्ट वैद्यकिय सेवा आता मिळणार असल्याचे सांगितले. वैद्यकिय महाविद्यालयातर्फे वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर आणि अधिष्टाता डॉ. प्रशांत सोळंके यांनी देखिल प्रवाशांना २४ तास उकृष्ट सेवा देण्याचा मानस व्यक्‍त केला. जळगावकर प्रवाशांप्रमाणे भुसावळकर प्रवासी देखिल या सेवेने समाधानी राहतील याबाबत आश्‍वस्त केले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here