जळगाव : डॉ. उल्हास पाटील कृषी, अन्न तंत्रज्ञान व कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय जळगाव येथे दि ९ २०२४ रोजी एकदिवसीय केळी प्रक्रिया उद्योगावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत केळीपासून बनविण्यात येणाऱ्या विविध उपपदार्थव्दारे शेतीमध्ये मूल्य वर्धन करणे, बचत गटांव्दारे कृषि आधारीत केळी प्रक्रिया उद्योगांना चालना देणे यावर मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ उपस्थीत राहणार आहेत. कार्यशाळेत प्रगतीशिल शेतकरी, लघुउदयोजक, शेतकरी गटांचे सभासद, कृषि विभागाचे कर्मचारी व विदयार्थी सहभागी होवू शकणार आहे. सदर कार्यशाळा ही निशुल्क असून या कार्यशाळेचे उदघाटन माजी खा डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते होणार आहे.
प्रमुख अतिथी भाजपा प्रदेश महिला उपाध्यक्षा डॉ केतकीताई पाटील, कृषि परिसर संचालक डॉ. एस एम पाटील, कृषि संशोधन व शिक्षण संचालक डॉ अशोक चौधरी, डॉ. संतोष राठी प्राचार्य अन्न तंत्रज्ञान महाविद्यालय, प्रा डॉ. शैलेश तायडे प्राचार्य कृषी महाविद्यालय, डॉ पुनमचंद सपकाळे प्राचार्य कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय आणि अतुल बोंडे सहायक कुलसचिव हे उपस्थीत राहणार आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन महाविद्यालयातर्फे करण्यात येत आहे. असा आहे कार्यक्रम – तांत्रिक सत्र नोंदणी व चहापान स. १०.३० ते ११.००, तांत्रिक सत्र सादरीकरण ११ .०० ते १.००, तसेच अनुभव सत्र १.३० ते ३.४५ पर्यत चालणार आहे. दु. ४ ते ४.३० समारोप केला जाणार आहे.