गोदावरी नर्सिंग विद्यार्थांसाठी स्किलबेस राज्यस्तरीय कार्यशाळा

0
104

जळगाव : येथील गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या मेडीकल सर्जीकल विभागातर्फे आयोजित सिम्युलेशन आणि कौशल्य आधारीत शिक्षण या दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी जीव वाचविण्याच्या पध्दती आणि लाईफ सपोर्टविषयक प्रात्याक्षिकांचा अनुभव घेतला. या कार्यशाळेला विद्यार्थ्यांसह अध्यापकांनी देखिल प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून अत्याधुनिक माहिती जाणून घेतली.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या मेडीकल सर्जीकल विभागातर्फे दि. ३ व ४ ऑक्टोबर रोजी नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी स्किलबेस दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या आयोजन अध्यक्षा म्हणून प्राचार्या विशाखा वाघ, आयोजन सचिव तथा मेडीकल सर्जीकल विभागाच्या प्रमुख मनोरमा कश्यप, कार्यशाळेच्या आयोजक प्रा. रश्मी टेंभुर्णे, प्रा. प्रिती गायकवाड ह्या होत्या. तर कार्यशाळेला अमेरीकन हार्ट असोसिएशनचे प्रशिक्षक प्रा. स्वप्नील रहाणे आणि प्रा. बलराम काठालीया (पारूल इन्स्टिट्युट ऑफ नर्सिंग, पारूल विद्यापीठ, गुजराथ) यांनी मार्गदर्शन केले.

तसेच हृदयविकार, लहान मुलांना होणारा हृदयाचा त्रास, अ‍ॅडव्हान्स कार्डीआक लाइफ सपोर्ट, बेसीक लाइफ सपोर्ट, पिडीयाट्रीक लाइफ सपोर्ट, सीपीआर पध्दत याविषयी प्रशिक्षक प्रा. स्वप्नील रहाणे आणि प्रा.बलराम काठालीया यांनी अत्यंत महत्वाची माहिती दिली. तसेच जीव वाचविण्याच्या या सर्व पध्दतींविषयीचे प्रात्याक्षिकही त्यांनी करून दाखविले. विद्यार्थ्यांसह अध्यापकांनी या प्रात्याक्षिकांच्या माध्यमातून जीव वाचविण्याच्या पध्दतींचा अनुभव जाणून घेतला. या कार्यशाळेला १५० विद्यार्थी आणि ५० अध्यापकांनी सहभाग नोंदविला. कार्यशाळेच्या समारोपाला विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यशाळेसाठी प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे यांच्यासह महाविद्यालयाच्या स्टाफने सहकार्य केले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here