जळगाव – गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात नुकतेच २६ ते २८ ऑक्टोबर दरम्यान दुपारी २ ते ५ या वेळेत सॉफ्ट स्किल्स व पर्सेनॅलिटी डेव्हलपमेंटवर ऑनलाईन सर्टिफिकेट कोर्सचे आयोजन करण्यात आले होते. तीन दिवसीय कोर्सद्वारे तब्बल १०० विद्यार्थ्यांना सॉफ्ट स्किल्स व व्यक्तीमत्व विकासाबाबत मिळालेल्या टिप्समुळे ज्ञानात भर पडली. कोर्स पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरणही करण्यात आले. या कोर्समध्ये रिया कुंदनानी सॉफ्ट स्किल्स ट्रेनर आणि इमेज कन्सल्टंट, सौम्या टी.आर सॉफ्ट स्किल्स आणि कॉर्पोरेट ट्रेनर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यात त्यांनी आंतरवैयक्तिक संवाद, सहानुभूती, व्यक्तिमत्व विकास, संघ भावना, आत्मविश्वास, समस्या सोडवणे, निर्णय घेणे, संघर्षाचे निराकरण, अनुकूलता, सर्जनशीलता, गंभीर विचार, ताण व्यवस्थापन, वेळ व्यवस्थापन, नेतृत्व, निश्चितता, सादरीकरण, व्यावसायिकता, कार्य नैतिकता प्रशिक्षणाची पद्धत याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी सहाय्य आणि प्रगती सेल गिनरा फाऊंडेशनच्या सहकार्याने सर्टिफिकेट कोर्स यशस्वीरित्या पार पडला. याप्रसंगी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा.विशाखा वाघ, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, प्रा.मनोरमा कश्यप, प्रा.रश्मी टेंभुर्णे, ट्यूटर प्रणाली बुडे यांचे मार्गदर्शन लाभले.