जन्म:च हृदयात छिद्र : डॉ.उल्हास पाटील रुग्णालयात 5 रोजी शस्त्रक्रिया शिबिर

0
81

"

जळगाव : जन्म:च हृदयात छिद्र असणे वा हृदयाशी संबंधित काही आजार असलेल्या बालकांवर डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील हृदयालयात रविवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी एएसडी/व्हीएसडी (डिव्हाईस क्‍लोजर) शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे. मागील वर्षभरापासून दर महिन्याला एकदा ह्या शिबिराचे आयोजन केले जात असून आतापर्यंत शेकडो बालकांवर यशस्वी उपचार झाले आहे.

या शिबिरात महात्मा ज्योतिबा फुले, आयुषमान भारत या योजनांद्वारे बालकांवर उपचार केले जाणार आहे. शिबिरापूर्वी बालकांची मोफत टू डी इको तपासणीही केली जाणार आहे. या शिबिरासाठी नावनोंदणी आवश्यक असून रत्नशेखर जैन यांच्याशी 7030571111, 8007705137 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here