सीएफओ नेक्स्ट १०० मध्ये सीए अस्मिता पाटील यांचा समावेश

0
50

"

जळगाव : मागील अकरा वर्षापासून नामांकित कंपनीत फायनान्शियल मॅनेजर या पदावर कार्यरत असलेल्या सीए अस्मिता सौरभ पाटील यांचा नुकताच समावेश सीएफओ नेक्स्ट १०० मध्ये झाला आहे. ही फार अभिमानाची बाब असून त्यानिमित्‍त राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझरचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास मुदगेरीकर व वित्‍तीय संचालक श्रीमती नझत शेख यांनी सीए अस्मिता पाटील यांचे अभिनंदन केले. मुंबई येथील राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायझर लिमिटेड या कंपनीत फायनान्स विभागात २०१२ पासून सीए अस्मिता पाटील ह्या कार्यरत आहे. सद्यस्थीतीला त्या फायनान्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.

फायनान्स क्षेत्राशी निगडीत नुकत्याच पार पडलेल्या सीएफओ नेक्स्टमध्ये देशभरातील १०० उत्कृष्ठ फायनान्स मॅनेजमेंट करणार्या व्यक्तींची निवड झाली. यात माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांचे ज्येष्ठ बंधू सुभाष पाटील यांच्या स्नुषा अस्मिता सौरभ पाटील यांची निवड झाली आहे. त्याबाबत नुकतेच सन्मानपत्र देखील त्यांना देण्यात आले. या निवडीबद्दल श्रीमती गोदावरी पाटील, माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, सुभाष पाटील, प्रा.डॉ.सुषमा पाटील, डॉ.सौरभ पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, सौ इशिता वायकोळे, श्री सागर वायकोळे, डॉ.अनिकेत पाटील, डॉ.अक्षता पाटील यांच्यासह आप्तेष्ठांनी अस्मिता पाटील यांचे अभिनंदन केले आहे.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here