अतिगंभीर स्वरूपाचे आजार व न उतरणाऱ्या तापासाठी शिबिर

0
48

"

जळगाव : डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात आजपासून कुठल्याही अतिगंभीर स्वरूपाच्या आजार व न उतरणाऱ्या तापासाठी जनरल मेडीसीन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात मोफत तपासणी केली जाणार असून पुढील उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचाराची सुविधा देखिल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किडनी, डेग्यु, फुफुस्स, ब्रेन हॅमरेज, विषबाधा,आणि लिव्हर मुळे अतिगंभीर आजार तसेच न उतरणारे तापासाठी जनरल मेडीसिन शिबिर आजपासून सूरू करण्यात आले आहे.

यासाठी तज्ञ डॉक्टरांची टीम नियुक्‍त करण्यात आलेली असून महिला व पुरूष मेडीसिन वार्डही सज्ज करण्यात आले आहे. याचशिवाय अतिगंभीर उपचाराची गरज असल्यास सूसज्ज अतिदक्षता विभाग देखिल सज्ज करण्यात आलेला आहे. शिबिरात दारूमूळे झालेले सर्व प्रकारचे लिव्हर, पोट व अन्ननलिकेच्या आजारांची तपासणी केली जाणार आहे. यात पोटात पाणी होणे पोट फुगणे, लिव्हरवर सूज, काविळ, पित्‍ताशय आजार, पित्‍ताशय खडा व इन्फेक्शन, रक्‍ताची उलटी, पॅनक्रियाचे आजार इ तपासणी केली जाणार आहे.

याचबरोबर पुढील उपचारासाठी केशरीव पिवळे रेशनकार्ड असल्यास महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोफत उपचाराची सोय देखिल उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी जास्तीत जास्त रूग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन रूग्णालय प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. योजना व अधिक माहितीसाठी आशिष भिरूड यांचेशी ९३७३३५०००९ या क्रमांकवर संपर्क साधावा तसेच डॉ. दिनेश चौधरी यांचेशी ९८२०८ ६४१९७ संपर्क करावा.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here