करिअर रोड मॅप : डिझाईन इंजिनियरवर मार्गदर्शन

0
61

"

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उपक्रम

जळगाव : गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये यंत्र विभागातील विद्यार्थ्यांना डिझाईनिंग क्षेत्राबद्दल विस्तृत माहिती देण्यासाठी व असलेल्या विविध संधी बद्दल मार्गदर्शन करण्यासाठी सेमिनारचे आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमासाठी यंत्र विभाग २०१४ बॅचचे श्री राजकुमार सोनटक्के (एल अँड टी टेक्नॉलॉजी) हे मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा. किशोर महाजन (समन्वयक, अ‍ॅल्युमिनी असोसिएशन), विभागातील सर्व प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.

श्री. राजकुमार सोनटक्के यांना डिझाईन क्षेत्रामध्ये विविध कंपन्यांमध्ये काम करण्याचा अनुभव आहे. त्यांनी डीसी डीझाईन,पी प्लस आयडीया,फलोरेसिआ एल टी टेक्नॉलॉजी, यामध्ये काम केलेले आहे. कार्यक्रमात मार्गदर्शन करताना त्यांनी सुरुवातीला मेकॅनिकल इंजिनियर साठी असलेले विविध करिअर ऑप्शन्स विद्यार्थ्यांना सांगितले, जसे की प्रोसेस इंजिनियर, डिझाईन इंजिनियर, एचव्हीएसी इंजिनियर, एरोनॉटिक इंजिनिअर, क्वालिटी, प्रॉडक्शन, रिसर्च अँड डेव्हलपमेंट अशा विविध क्षेत्रांमध्ये विद्यार्थी काम करू शकतात.त्यानंतर त्यांनी प्रॉडक्ट डिझाईन आणि डेव्हलपमेंट या सर्विसेस मधील महत्त्वाचे फॅक्टर्स विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.ऑटोमोटिव्ह डिझाईन इंजिनियर म्हणून करिअर करायचे असेल तर त्या संदर्भात इंटरेस्ट, क्रिएटिव्हिटी, फिजिकल डिमांड, सायकॉलॉजिकल डिमांड हे सर्व मुद्दे यांनी उदाहरणासहित स्पष्ट केले.

तसेच कम्युनिकेशन आणि प्रेझेंटेशन स्किल, कार व इतर वाहन यांच्या बद्दल नॉलेज, ड्रॉइंग अँड स्केचिंग या सर्व बाबींवर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.जागतिक पातळीवर ऑटोमोटिव्ह डिझाईन करिअर चे भविष्य, व असलेल्या संधी तसेच त्यासाठी लागणारे डोमेन आणि टूल नॉलेज (कटीया, युजी एन एक्स, क्ले मॉडलिंग, डिजिटल रेंडरिंग) याबद्दल सविस्तर माहिती दिली.कार्यक्रमा नंतर विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची त्यांनी समर्पक उत्तरे दिली.सदर कार्यक्रमाचे नियोजन यंत्र विभागाचे प्रा. किशोर महाजन यांनी प्रा. तुषार कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली केले.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कामिनी रुले या विद्यार्थिनीने केले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here