गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयाकडून मन्यारखेडा तलावावर स्वच्छता मोहीम

0
46

"

जळगाव । गोदावरी फाउंडेशन संचलित इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अँड रिसर्च जळगाव महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी एक जबाबदार नागरीक व आपल्या सभोवतालचा परिसर हा स्वच्छ असला पाहिजे त्यामुळे रोगराई तसेच प्रदूषण कमी होते या उद्देशाने व स्वच्छता पखवाडा अंतर्गत येणारा व शासनाच्या निर्देशाने स्वच्छता ही सेवा ही मोहीम मन्यारखेडा परिसरामध्ये असलेल्या तलावाजवळ राबविली.

गणपती विसर्जनानंतर तलावाजवळ असलेले निर्माल्य, प्लास्टिक व इतर कचऱ्याचे विद्यार्थ्यानी संकलन केले. या मोहिमेमध्ये महाविद्यालयाच्या सुमारे १०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके व नॅक समन्वयक डॉ. नीलिमा वारके यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here