डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात रूग्णांना फराळ वाटप करून दीपोत्सव साजरा

0
36

"

महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी मारवाडी संघटन जळगावचा उपक्रम

जळगाव : वसुबारसपासून दिवाळीला सुरुवात झाली असून दीपोत्सवाच्या दुसर्‍या दिवशी अर्थात धनत्रयोदशीला गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय रूग्णालयातील रूग्णांना फराळ वाटप करत जळगाव जिल्हा माहेश्वरी संगठन अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी मारवाडी संघटन जळगाव शाखेने आदर्श निर्माण करत आरोग्यमय शुभेच्छा दिल्या. देशातील जनता दिपावली उत्सव साजरा करत असतांना रूग्णांना दिपावली आजारापणामूळे रूग्णालयातच चिंताग्रस्त वातावरणात साजरी करता येत नाही.

या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदेश माहेश्‍वरी मारवाडी संघटन अंतर्गत जळगाव जिल्हा माहेश्‍वरी मारवाडी संघटन शाखेने दिपावली निमित्‍त रूग्ण व कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून चिंताग्रस्त वातावरणातून दिलासा देण्याचा प्रयत्न केला तसेच आरोग्यमयी शुभेच्छा व्यक्‍त करत लवकरात लवकर बरे होण्याची परमेश्‍वराजवळ प्रार्थना केली. यावेळी जिल्हाध्यक्ष सुमती नवाल, सचिव मनिषा तोतला, माजी प्रदेशाध्यक्ष ज्यात्सना लाहोटी, सरिता मंत्री कासोदा, तहसिल अध्यक्ष पुष्पा दहाड, आणि जिल्हयातील पदाधिकारी उपस्थीत यावेळी रूग्णालयातील ४०० च्या वर रूग्ण व नातेवाईकांना फराळ वाटप करण्यात आले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here