गोदावरी व्यवस्थापन व डॉ वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन महाविद्यालयात दिवाळी साजरी

0
52

"

जळगाव : गोदावरी फाउंडेशन संचलित इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च जळगाव आणि डॉ. वर्षा पाटील वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अ‍ॅप्लिकेशन महाविद्यालयात दिवाळी साजरी केली. महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत वारके यांनी महालक्ष्मीचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजा केली. याप्रसंगी विद्यार्थ्यांना ते म्हणाले की दिवाळी म्हणजे अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीक. दिवाळी हा आनंदाचा सण आणि हा आनंद आपण दुसर्‍यांना द्यायला हवा.

विद्यार्थ्यानी नेहमी अद्ययावत राहून नवीन ज्ञान आत्मसात करून दुर्गुणावर मात करू असा संकल्प करायला पाहिजे. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यानी सजावट केलेली होती. विद्यार्थ्यानी फटाके फोडून एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी डॉ वर्षा पाटील वुमेंस कॉलेज ऑफ कॉम्प्युटर प्लिकेशन महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ निलिमा वारके यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थीत होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here