गोदावरी फाऊंडेशन संचलित शाळा-महाविद्यालयांमध्ये गणरायाची उत्साहात स्थापना; विद्यार्थ्यांचा जल्लोष

0
42

"

जळगाव : सर्वत्र गणरायच्या आगमनाचा उत्साह दिसून येत आहे. पारंपारिक पद्धतीने ढोल, ताशांच्या गजरात गणपतीच्या मिरवणुका निघाल्या आहेत. गोदावरी फाऊंडेशन संचलित विविध महाविद्यालये शैक्षणिक संस्थांमध्ये आज विद्यार्थ्यांनी श्री गणरायाची विधीवत प्रतिष्ठापना केली. येथील विद्यार्थीनींनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून उत्कृष्ट असा चांद्रयान ३ चा देखावा यावर्षी लक्ष वेधून घेत आहे. अन्नपूर्णालयम येथे डॉ.केतकी पाटील – डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते गणपती बाप्पाचे विधीवत पूजन करण्यात आले. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात गणेशोत्सवा निमित्त विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आणि स्पर्धा राबविण्यात येणार आहे. डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल, भुसावळ येथे डॉ.उल्हास पाटील व सचिव डॉ.वर्षा पाटील या दांम्पत्याच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यानंतर शिक्षिकांनी अथर्वशिर्षाचे सामूहिक पठण केले.

डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय परिसरातील अन्नपूर्णालयम येथे आज दिनांक १९ सप्टेंबर रोजी शुभ मुर्हूर्तावर डॉ.केतकी पाटील व डॉ.वैभव पाटील या दांम्पत्याच्या शुभहस्ते गणपती बाप्पाचे विधीवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, मेडिकल सुपरिटेडेंट डॉ.प्रेमचंद पंडित, अधिष्ठाता डॉ.एन.एस.आर्विकर, डॉ.माया आर्विकर, डॉ.रॉय यांच्यासह मान्यवर उपस्थीत होते. याप्रसंगी पौराहित्य डी.टी.राव यांनी केले. यावेळी अन्नपूर्णालयममधील संपूर्ण स्टाफने गणपती बाप्पाच्या नामाचा गजर केला.

डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात श्रीं ची स्थापना

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात आज मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकी पाटील व डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या शुभहस्ते श्रीं ची स्थापना झाली. याप्रसंगी गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेव, दु:ख दूर कर, निरोगी आरोग्य प्रदान कर अशी प्रार्थनाही करण्यात आली. रुग्णांनी देखील गणपती बाप्पाचा आशिर्वाद घेऊन गणेशोत्सवात सहभाग नोंदविला. दरवर्षाप्रमाणे यंदाही डॉ.उल्हास पाटील धर्मदाय रुग्णालयात नर्सिंग ऑफिसच्या समोर आज गणपतीची स्थापना करण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व सचिव डॉ.वर्षा पाटील यांच्यासह चिमुकल्या किवा व सारा पाटील यांची विशेष उपस्थीती होती.

याप्रसंगी विधीवतपणे श्री गणेशाचे पूजन व महाआरती डॉ.पाटील दांम्पत्यांच्या हस्ते करण्यात आली. या संपूर्ण कार्यक्रमाप्रसंगी रुग्णांनी देखील पुजेत सहभाग घेतला. या उत्सवाच्या कालावधीत आरोग्याच्या तक्रारींमुळे हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट आहोत, पण येथील या बाप्पाच्या उत्सवामुळे आम्हाला आनंद झाला असून गणपती बाप्पा सर्वांना सुखी ठेवो अशी प्रार्थनाही यावेळी रुग्णांनी केली तसेच डॉ.उल्हास पाटील यांच्यासह कुटूंबियांचे येथील सेवा व सुविधेबद्दल आभारही मानले. याप्रसंगी नर्सिंग ऑफिसचे संकेत पाटील, चिन्मय शुक्‍ला, किर्ती पाटील, आकाश धनगर यांच्यासह रुग्णालयात अहोरात्र सेवा देणारा नर्सिंग स्टाफसह निवासी डॉक्टरांची उपस्थीती होती.

गोदावरी व्यवस्थापन महाविद्यालयात लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत

गोदावरी फाउंडेशन संचलित गोदावरी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च जळगाव महाविद्यालयात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. सकाळी ९ वाजता महाविद्यालयातील सर्व अभ्यासक्रमाच्या च्या विद्यार्थ्यानी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. महाविद्यालयाच्या एम.बी.ए, एम.सी.ए, बी.बी.ए व बी. सी.ए च्या सर्व विद्यार्थ्यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.

महाविद्यालयामध्ये गणेशोत्सव सात दिवस साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून उत्कृष्ट असा चांद्रयान ३ चा देखावा व सजावट केली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे कामकाज प्रा.चारूशीला चौधरी यांनी केले. या कार्यक्रमास डॉ. प्रशांत वारके, डॉ. निलीमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. वर्षा पाटील महिला महाविद्यालयात चांद्रयान-३ चा देखावा

गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ. वर्षा पाटील वुमन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँप्लिकेशन,जळगाव महाविद्यालयात गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत झाले. सकाळी ९ वाजता महाविद्यालयातील बी. सी. ए. अभ्यासक्रमाच्या विद्यार्थीनींनी विधिवत प्राणप्रतिष्ठा केली. महाविद्यालयामध्ये गणेशोत्सव सात दिवस साजरा करण्यात येणार असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. विद्यार्थीनींनी यावर्षी पर्यावरण पूरक वस्तूंचा वापर करून उत्कृष्ट असा चांद्रयान ३ चा देखावा व सजावट केली आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे कामकाज प्रा. योगिता घोंगडे यांनी केले. या कार्यक्रमास प्राचार्या डॉ. निलीमा वारके यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय येथे दि. १९ सप्टेंबर २०२३ रोजी जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी गणपती बाप्पाचे वाजत गाजत स्वागत केले. गणपती मूर्तीची प्राणप्रतिष्ठा महाविद्यालयातील अतुल खोंडे यांनी सपत्नीक केली. याप्रसंगी गोदावरी फाउंडेशनच्या सचिव डॉ. वर्षा पाटील व सदस्य डॉ. केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील (डी एम कार्डिओलॉजी), महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील, प्रा.दीपक झांबरे (तंत्रनिकेतन समन्वयक) यांच्यासह सर्व विभाग प्रमुख व प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. मिरवणुकी दरम्यान विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह जाणवत होता. पाच दिवस स्पर्धांचे महाविद्यालयामध्ये हा गणेशोत्सव पाच दिवस साजरा करण्यात येणार आहे.

गणेशोत्सवा निमित्त महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम आणि स्पर्धा राबविण्यात येणार आहे. त्यामध्ये दिनांक २० सप्टेंबर रोजी रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे व या स्पर्धेसाठी थीम म्हणून गणपती व चंद्रयान ३ या विषयांची निवड करण्यात आली आहे. हा कार्यक्रम प्रा. प्रिया इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. दिनांक २१ सप्टेंबर रोजी शाडू मातीचा गणपती बनवण्याची स्पर्धा घेण्यात येणार आहे. हा कार्यक्रम प्रा. वैष्णवी नारखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली होईल. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी महाविद्यालयामध्ये श्री गणेश उत्सव विद्यार्थी समिती नेमण्यात आली आहे. त्यामध्ये तुषार पाटील, हेमंत झांबरे, आशिष पाटील, हिमांशू पाटील, अभिजीत पवार, हिमाक्षी राणे, दिपाली खोडके, सानिका राजकुळे व प्राची गिरासे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच त्यांच्या सोबतीने महाविद्यालयाचे सर्वच विद्यार्थी या उत्सवात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविणार आहेत. प्रा. आर व्ही पाटील, प्रा. सचिन महेश्री व प्रा. चंद्रकांत शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समिती कार्य करीत आहे. गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठे प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते.

डॉ.उल्हास पाटील सीबीएसई स्कूल, भुसावळ

गोदावरी फाऊंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूल येथे मंगळवार दिनांक १९ सप्टेंबर रोजी सकाळीच श्री गणेशाची विधीवतपणे स्थापना करण्यात आली. याप्रसंगी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील व सचिव डॉ.वर्षा पाटील या दांम्पत्याच्या हस्ते महाआरती करण्यात आली. गणेशाला आवडणारे लाडूचे यावेळी प्रसाद स्वरुपात वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थीत शिक्षक-शिक्षिकांनी अथर्वशिर्षाचे सामूहिक पठण केले. याप्रसंगी शाळेच्या प्राचार्या अनघा पाटील ह्या देखील उपस्थीत होत्या.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा आगळा वेगळा गणपती

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात नर्सिंगचे शिक्षण घेऊन रुग्णांची सेवा-सुश्रृषा करणार्‍यांनी विद्यार्थ्यांनी यंदाच्यावर्षी ग्रामीण संस्कृतीचे वर्णन दाखविणारा हुबेहुब असा आकर्षक देखावा साकारला असून तरुणाईंचे आयडॉल असणार्‍या गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील व सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ञ डॉ.वैभव पाटील यांच्या शुभहस्ते महाआरती करण्यात आली. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात आज गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली असून पाच दिवसांचा गणेशोत्सव येथे साजरा करण्यात येणार आहे. त्या गणेशोत्सवास आज प्रारंभ झाला असून प्रवेशद्वारापासून आपण मंदिरातच जात आहोत अशी सुंदर सजावट विद्यार्थ्यांनी केली आहे.

ग्रामीण भागातील संस्कृतीची अभ्यास करत एक एक सर्वच गोष्टी देखाव्यातून दाखविण्यात आल्या आहेत. याप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.स्वाती गाडेगोने व श्री पंकज (पती) यांच्याहस्ते गणपती बाप्पाची स्थापना करण्यात आली. श्री गणेशाच्या स्थापनेनंतर डॉ.पाटील दाम्पत्यांच्याहस्ते महाआरती करण्यात आली, यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा गजर करण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य विशाखा गणवीर, शिवानंद बिरादार, प्रशासकीय अधिकारी प्रवीण कोल्हे, सर्व शिक्षक वृंद व विद्यार्थ उपस्थीत होते. या उपक्रमासाठी प्राचार्यांपासून ते प्राध्यापक, विद्यार्थी वर्गाने मेहनत घेऊन उत्कृष्ठ गणेशोत्सवाचे नियोजन केले आहे.

गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे बाप्पाच्या आगमनची पूर्वतयारी म्हणून इको फ्रेंडली गणपती बनवणे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गणपती बनविण्यासाठी शाडूच्या मातीचा प्रामुख्याने वापर करण्यात आला. या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला पर्यावरणपूरक गणपती स्थापन करूया… या उद्देशाने शाडू मातीच नव्हे तर विद्यार्थ्यांनी विविध पाने, फुले, कागद, फळभाज्या त्यांच्यापासून गणपती बाप्पाची प्रतिमा बनवली. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here