पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंदिर स्वछता अभियानाला डॉ केतकी पाटील यांचा प्रतिसाद

0
16

"

भुसावळ येथील अष्टभुजा देवी मंदिरापासून स्वच्छता, सुशोभीकरणास प्रारंभ

जळगाव : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ ते २१ जानेवारी दरम्यान मंदिर स्वछता अभियान राबविण्याचे आवाहन केले केले. त्यांच्या या आवाहनाला प्रतिसाद देत गोदावरी फाऊंडेशन संचालिका डॉ केतकी ताई पाटील यांनी आज भुसावळ येथील श्री अष्टभुजा देवी मंदिरापासून स्वच्छता व सुशोभीकरणास प्रारंभ केला. मर्यादा पुरुषोत्‍तम प्रभु श्रीराम चंद्राच्या अयोध्याधाम येथे येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी विराजमान सोहळा व मंदिर उद्घाटनाचे भव्य आयोजन केले आहे. त्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंदिर व परिसर स्वछता अभियान करण्याचे आवाहन केले आहे. त्या आवाहनाला प्रतिसाद देत गोदावरी फाऊंडेशन संचालिका डॉ केतकी ताई पाटील यांनी मंदिर स्वच्छता अभियानास मंगळवार दिनांक १६ जानेवारीपासून प्रारंभ केला.

आज सकाळी भुसावळ येथील अष्टभुजा देवी मंदिरात डॉ.केतकी पाटील यांनी स्वत: हातात झाडू घेत स्वच्छता केली तसेच प्रागंणात रांगोळी देखील साकारुन सुशोभीकरण केले. याप्रसंगी मंदिरातील विशाल विजयकुमार ठक्‍कर, सीमा विजयकुमार ठक्‍कर, रुपाली विशाल ठक्‍कर, पुजारी अशोक भट्ट हे उपस्थीत होते. याप्रसंगी रुपाली ठक्‍कर यांनी डॉ केतकी ताईंचे स्वागत करुन ओटी भरली. या प्रसंगी डॉ.केतकीताई पाटील यांनी मकर संक्राती च्या शुभेच्छा दिल्यात.

प्रसन्न वातावरण आणि निरोगी आरोग्यासाठी स्वछता असणे खूप गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त सर्वांना मंदिर स्वछता अभियान राबविण्याचे आवाहन केले. त्यानुसार मंदिर स्वछता अभियान सुरु केले आहे. नागरिकांनी देखील या कार्यात सहभागी व्हावे, मंदिरांसोबतच आपले घर, परिसरात देखील स्वछता करावी, जेणेकरून आरोग्य चांगले राहील.

– डॉ केतकी ताई पाटील, संचालिका, गोदावरी फाऊंडेशन

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here