अतिवृष्टी झालेल्या नुकसानग्रस्त भागास डॉ. केतकीताई पाटील यांची भेट

0
49

"

बोदवड : येथील धोंडखेडा ता. बोदवड येथे अतिवृष्टीमुळे अनेक घरांत पाणी शिरून नुकसान झाले तसेच शेतीचेही खूप नुकसान झाले. यावेळी नुकसानग्रस्त भागात डॉ. केतकीताई पाटील यांनी भेट देवून पाहणी केली. नुकसानग्रस्त नागरिकांना शासनाकडून मदत मिळविण्यासाठी आपण पाठपुरावा करु, असे आश्वासन डॉ.केतकीताई पाटील यांनी यावेळी दिले.

येथील तेजसिंग पाटील गट नं.९ यांची शेतजमीन वाहुन गेली. तसेच अनेक शेतात नाल्याचे पाणी शिरल्याने मका, कपाशी पिकांचे नुकसान झाले तसेच सखाराम राजपुत व लक्ष्मण सुपडू चांभार यांच्यासह अनेक घरात पाणी शिरून नुकसान झाले. यावेळी डॉ. केतकीताई यांच्याजवळ संवेदना व्यक्‍त करतांना शासनाने नुकसाग्रस्ताना त्वरित नुकसान भरपाई द्यावी,यासाठी आपण प्रयत्न करावे अशी मागणी केली.

नाल्याला संरक्षण भिंत बांधल्यास भविष्यात अशा घटना टाळल्या जाऊ शकतात असेही ग्रामस्थांच्या संवादातून स्पष्ट झाले.लोणवाडी येथे देखील चित्रलेखा सपकाळे, प्रेम सपकाळे, मुक्तार खा पठाण यांच्या घरात पाणी शिरून अतोनात नुकसान झालेले दिसून आले. येथील नागरिकांनी देखिल डॉ. केतकीताई यांनी शासन दरबारी कैफीयत मांडून मदत मिळवून दयावी अशी विनंती केली.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here