कर्तव्यावर असलेल्या सैनिकांच्या परिवारासोबत डॉ.केतकीताई पाटील यांनी साजरा केला दीपोत्सव

0
47

"

जळगाव : दिवाळीला सुरुवात झाली असून दीपोत्सवाच्या पहिल्याच दिवशी अर्थात वसू बारसला गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील यांनी भुसावळ तालुक्यातील आदर्शगाव फुलगाव येथे कर्तव्यावर असलेल्या सैनिकांच्या परिवाराला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. भारतीय सैनिकांमुळे देशातील जनता सुरक्षितपणे आपले उत्सव साजरे करत असतात. पण ड्युटी वर असलेल्या सैनिकांच्या कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या सैनिक मुलांशिवाय दिवाळी साजरी करावी लागते. या अनुषंगाने गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकीताई पाटील यांनी गुरुवार दिनांक ९ नोव्हेंबर रोजी फुलगावात जाऊन जे सैनिक या दिवाळीला गावी येऊ शकत नाही अशा कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधून दिपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी सैनिक भूषण विलास पाटील जे राजस्थान येथे कर्तव्यपूर्ती करत आहे त्यांची आई शैला विलास पाटील, काकू रेखा शंकर पाटील, काका किशोर मोरेश्वर पाटील, संगीता किशोर पाटील यांना शुभेच्छा दिल्या .दिल्ली येथे ड्युटी वर असलेले सैनिक देवेंद्र चंद्रकांत महाजन यांच्या घरी त्यांचे वडील चंद्रकांत भालचंद्र महाजन, आई पुष्पा महाजन, भाऊ भूषण महाजन, शीतल भूषण महाजन यांना शुभेच्छा भेट दिली. तसेच आसाम येथे ड्युटी वर असलेले अतुल शिंदे यांच्या घरी भेट दिली यावेळी त्यांचे वडील रमेश दगडू शिंदे, आई आशा शिंदे ,मयुरी अतुल शिंदे व अतुल यांचा मुलगा व मुलगी उपस्थित होते.

अतुल यांचा लहान भाऊ निलेश हा सशस्त्र सेना दल मध्ये सिक्कीम येथे कार्यरत आहे. याच गावातील योगेश अशोक पाटील हा प्यारा आर्मी मध्ये आग्रा येथे आहे. तो हवालदार पदावर आहे. त्याचे वडील अशोक रामचंद्र पाटील व आई कल्पना पाटील यांची भेट घेऊन दीपोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. या गावातील बहुतांश सैनिक दिवाळीला अनेक वर्षे घरी येऊ शकले नाहीत. डॉ. केतकीताई पाटील यांच्या सोबत सैनिकांच्या कुटूंबियांनी दिलखुलास गप्पा केल्या. सैनिकांच्या परिवाराला शुभेच्छा देतांना खर्‍या अर्थाने दीपोत्सव साजरा होत असल्याची भावना डॉ. केतकी पाटील यांनी व्यक्त केली.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here