गड मोहीमवरून आलेल्या ७०० हुन अधिक धारकऱ्यांचे डॉ केतकीताई पाटीलांनी केलं स्वागत

0
52

"

छत्रपती शिवाजी महाराजांची आरती; धारकर्यांना दिला अल्पोपहार

जळगाव । श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थांतर्फे २४ ते २८ जानेवारी दरम्यान गडकोट मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण करून आलेल्या ७०० हुन अधिक धारकऱ्यांचे आज सकाळी जळगाव रेल्वे स्टेशन वर आगमन झाले. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील गड किल्ले मोहीम पुनः करून आलेल्या सर्व धारकऱ्यांचे स्वागत केले व त्यांच्याशी संवाद साधत अनुभव जाणून घेतले.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्याकडून आयोजन केलेली श्री.प्रतापगड मार्गे श्री क्षेत्र महाबळेश्वर धारातीर्थ मोहिम आज यशस्वीरीत्या पूर्ण होऊन धारकरी जळगाव शहरात परतले. छत्रपती शिवाजी महाराज राज्यभिषेक सोहळ्याला यंदा ३५० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त शिवप्रतिष्ठान घेत असेलला हा उपक्रम स्तुत्य आहे. त्याबद्दल मोहिमेत सहभागी सर्व धारकऱ्यांचे स्वागत आज सकाळी भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी केले.

या प्रसंगी त्यांच्या समवेत हृदयरोग तज्ञ् डॉ वैभव पाटील हे होते. या प्रसंगी जळगाव रेल्वे स्थानक ते जी एस ग्राउंड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यन्त पायी चालून येत छत्रपती शिवाजी महाराजांना मनाचा मुजरा केला. यावेळी महाराजांची आरती करून जय भवानी जय शिवाजी च्या जय घोषणे परिसर दुमदुमून गेला. याप्रसंगी धारकऱ्यांसाठी नाष्टा आणि चहाचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवप्रतिष्ठानचे धारकरी विभाग प्रमुख जळगाव शहर, विजय कासार आणि धारकरी जिल्हाप्रमुख आकाश फडे यांच्याशी संवाद साधला. डॉ केतकी ताई पाटील यांनी उपस्थित राहून केलेल्या स्वागताबद्दल धारकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here