फैजपूर येथे सव्वा लाख दिपोमहोत्सव सोहळा; डॉ.केतकीताई पाटील यांनी घेतली नियोजनाची माहिती

0
44

"

फैजपूर : न भूतो न भविष्यती असा भव्य सोहळा २२ जानेवारी ला अयोध्येत पार पडणार असून, त्यानिमित्त फैजपूर येथील श्री. खंडेराव देवस्थान येथे सव्वा लाख दिपोमहोत्सव सोहळ्याचे नियोजन युवा नेत्या तथा गोदावरी फाउंडेशन संचालिका डॉ.केतकीताई पाटील यांनी आज जाणून घेतले. या अप्रतिम कार्यक्रमास सर्वोतोपरी सहकार्य करू असे आश्वासन डॉ.केतकीताई पाटील यांनी दिले.

गोदावरी फाउंडेशन संचालिका डॉ.केतकीताई पाटील यांनी नुकतीच फैजपूर येथील श्री खंडेराव देवस्थान येथे जाऊन दर्शन घेतले. यांनतर ताईंना आगामी काळात येथे होऊ घातलेल्या सव्वा लाख दिपोमहोत्स्व सोहळ्याची माहिती गादीपती पवनकुमारदास महाराज यांनी दिली. यावेळी सव्वा लाख दिव्यांचे नियोजन, त्या दिवशी येणार्या भाविकांसाठी या सोहळ्याचा लाभ घेता यावा याकरिता नियोजन, महाप्रसाद या सर्वाची माहिती जाणून घेतली. २२ जानेवारीला दुपारी २ वाजता सामूहिक सुंदर कांड ला प्रारंभ होईल. त्यानंतर महाआरती व भव्य दीपप्रज्वन होईल.या करिता शीतल अकादमी, साईनाथ टेन्ट अँड इव्हेंट यांचे सहकार्य लाभत आहे.

यावेळी श्री खंडेराव मंदिराचे उत्तराधिकारी पवनकुमारदास महाराज, श्री विनोद कपले आदी उपस्थित होते. या सोहळ्यासाठी श्री चंद्रकांत भिरुड, श्री.अमोल चौधरी, विनोद परदेशी, विक्की जैस्वाल, पप्पू सरोदे आदींचे सहकार्य लाभत आहे. याप्रसंगी खंडेराव देवस्थानाचे गादीपती श्री. पवन दासजी महाराज, युवा कार्यकर्ते विकी भाऊ जयस्वाल, अमोल चौधरी, विनोद कपले, मनोज चौधरी, संजय चौधरी, पंडित राणे,संदीप माळी, चंद्रकांत प्रतीक वारके, विशाल शर्मा आदि उपस्थीत होते.

अभूतपुर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हा – डॉ.केतकी पाटील
अयोध्येत साकारलेल्या भव्य मंदिरात २२ जानेवारीला मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून त्यापार्श्वभूमीवर फैजपूर येथील श्री खंडेराय देवस्थानाने देखील भाविकांसाठी भव्य दिपमहोत्सवाचे आयोजन केले आहे. अयोध्येतील सोहळ्यासाठी प्रत्येकाला जाणे शक्य नसले तरी आपल्या या भूमीत देखील भव्य-दिव्य सोहळा आयोजित केला आहे, त्याकरीता देवस्थान समितीचे तयारी जोरदार सुरु असून मी देखील यात पूर्णतः समर्पित योगदान देणार आहे. रावेर लोकसभा मतदार संघातील नागरिकांनी देखील या अभूतपुर्व सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील यांनी केले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here