डॉ.उल्हास पाटील, डॉ.केतकी पाटील गणपती विसर्जन मिरवणूकीत ठेका धरतात तेंव्हा…

0
56

"

जळगाव : गणपती बाप्पा मोरया.., पुढच्या वर्षी लवकर या… असे म्हणत डीजे समवेत गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाची गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील तसेच डॉ.केतकीताई पाटील यांच्यासह पाटील कुटूबियांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात पाच दिवसांचा गणेशोत्सव सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यासाठी महाविद्यालय परिसरात आकर्षक सजावट करुन ग्रामीण संस्कृतीचे दर्शन दाखविणारा देखावा देखील यावर्षीचे आकर्षण ठरला. गणपती बाप्पाला वाजत-गाजत मिरवणूक काढून निरोप देण्यात आला. या मिरवणूकी संस्थेचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकी पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील, चिमुरड्या कु.किवा व कु.सारा ह्यांची देखील विशेष उपस्थीत होती.

डोक्यावर फेटे परिधान करुन गाण्यांच्या तालावर ठेका धरत माजी खासदार डॉ.उल्हास पाटील व डॉ.केतकी पाटील यांनी मिरवणूकीची शोभा वाढविली. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या प्राचार्या विशाखा वाघ, शिवानंद बिरादर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे यांच्यासह संपूर्ण स्टाफ सर्व विद्यार्थी-विद्यार्थीनींनी गणेशोत्सव मिरवणूकीचा आनंद लुटला.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here