औषधांच्या प्रतिकूल परिणामांबद्दल जनजागृती; डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयायाचा उपक्रम

0
46

"

जळगाव : डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात १७ ते २३ सप्टेंबर २०२३ दरम्यान नॅशनल फार्मेकोव्हिजिलन्स सप्ताह विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. या सप्ताहातून औषधींच्या प्रतिकूल परिणामांबाबात समाजात जनजागृती करण्यात आली. सोमवार दिनांक १८ सप्टेंबर रोजी नॅशनल फार्मेकोव्हिजिलन्स सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयातील प्रा.डॉ.देवेंद्र चौधरी यांनी फार्मेकोव्हिजिलन्स बाबत संवाद साधला.

२१ रोजी डॉ.उल्हास पाटील फिजीओथरेपी कॉलेज व गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग येथे आणि २२ सप्टेंबर रोजी डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथी कॉलेज येथेही फार्मेकोव्हिजिलन्स बाबत प्रा.डॉ.बापुराव बिटे यांनी सेमिनार दिला. यानंतर २३ सप्टेंबर रोजी ई-पोस्टर कॉम्पिटीशन घेण्यात आली असून बक्षीस वितरण करण्यात आले. यात द्वितीय वर्ष एमबीबीएसच्या गीतांजली कवाळे व सानिया शेख या विजेत्या ठरल्यात. औषधांच्या प्रतिकुल परिणामांची नोंद करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना, भारतीय औषधकोष संस्था, औषधदक्षता केंद्र व राष्ट्रीय सुसुत्रीकरण केंद्र यांच्या मार्फत दिनांक १७ ते २३ सप्टेंबर कालावधीत भारतामध्ये औषध दक्षता सप्ताहाचे आयोजन करण्यास सांगितले होते.

त्यापार्श्वभुमीवर डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव येथे “औषध दक्षता” सप्ताहानिमित्‍त औषधशास्त्र विभागातर्फे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. समाजामध्ये औषधाचे उचारात्मक गुणधर्म माहिती असतात. परंतु औषधांच्या अपायकारक दुष्परिणामबद्दल जागृती करण्याचे ध्येय या सप्ताहात साधले गेले. विविध महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच डॉक्टरांनाही याचे महत्व विशद करण्यात आले. तसेच औषधांचे प्रतिकूल (दुष्परिणाम) नोंद करण्यासाठी डॉक्टर्स, नर्से, औषधविक्रेता, रुग्ण किंवा रुग्णांचे नातेवाईक यांना विशिष्ठ नमुना उपलब्ध करुन देण्यात आला.

औषध प्रतिकूल (दुष्परिणाम) केंद्र हे औषधशास्त्र विभाग डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कार्यरत आहे. तरी सर्वसंबंधितांनी प्रतिकूल परिणाम नोंद करण्याचे आवाहन डॉ.देवेंद्र चौधरी यांनी केले आहे. या सप्ताहाच्या यशस्वीतेसाठी औषधशास्त्र विभागप्रमुख डॉ.देवेंद्र चौधरी, डॉ.राहूल भावसार, डॉ.बापूराव बिटे, डॉ.नमिता यांनी परिश्रम घेतले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here