खेळाच्या सरावामुळे सक्रीयता वाढते – डॉ.उल्हास पाटील

0
73

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये क्रीडा सप्ताहाचे जल्लोषात उद्घाटन

जळगाव : खेळ हे आपल्यासाठी खूप फायदेशीर आहे. कारण खेळामुळे वेळेचे बंधन, धैर्य, शिस्त, गटामध्ये काम करणे हे शिकायला मिळते. तसेच खेळ आत्मविश्वासाची पातळी वाढविण्यास आणि त्यामध्ये सुधारणा करण्यात मदत करते. खेळाचा नियमानं सराव केल्यावर आपण अधिक सक्रिय आणि निरोगी राहू शकतो, असे प्रतिपादन गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी केले.

गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव, येथे आज सोमवार दिनांक १८ डिसेंबर पासून क्रिडा सप्ताहास प्रारंभ झाला. यावेळी गोदावरी स्कूलचा विद्यार्थी तथा राष्ट्रीय स्तरावर खेळणारा खेळाडू गौरव महाजन याने मशाल प्रज्वलित केली. यावेळी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, डॉ.वर्षा पाटील, गोदावरी इंजीनियरिंग कॉलेजचे प्रोफेसर इंगळे, शफिक, प्रा.जाधव, स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी यांच्या हस्ते क्रिडा सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी डॉ.पाटील बोलत होते. कार्निवल (आनंद उत्साह), ग्रीन, येल्लो, ब्ल्यू, रेड हाऊस ने नृत्य सादरीकरण केले. यावेळी सर्व हाऊसेस, हाऊस लीडर्स, हाऊस कॅप्टन मध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद, उत्साह दिसून येत होता.

याप्रसंगी खेळ ही चांगली शारीरिक क्रिया आहे जी तणाव आणि चिंतामुक्त करते. खेळाडूंसाठी चांगले भविष्य आणि व्यावसायिक जीवन देते. खेळ खेळाडूंना नाव, प्रसिद्धी आणि पैसे देण्याची क्षमता ठेवतो. आपल्या मेंदूला, शरीराला आणि आत्म्याला फायदा असल्याचे डॉ. वर्षा पाटील यांनी मनोगताद्वारे सांगितले. तसेच प्रत्येक हाऊसचे कौतुक करुन प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिताली बोंडे, दिव्यांका कोलगे, रिध्दी जावळे तसेच आभार प्रदर्शन नारायणी पांडे या विद्यार्थ्यांनी केले. या कार्यक्रमासाठी क्रीडा विभागाचे प्रमुख डॉ. आसिफ, पंकज तिवारी, प्रसाद देशमुख क्रीडा शिक्षक, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here