केळी प्रक्रिया उद्योग रोजगाराच्या नवीन संधी

0
29

गोदावरी कृषी परिसरातील कार्यशाळेत मान्यवरांचा सूर

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील केळीला मोठी मागणी राहिली आहे. त्यामुळे केळी पिकासह त्यावरील प्रक्रिया उद्योगांचे महत्व देखिल आता पटले असून केळी प्रक्रिया उद्योग म्हणजे रोजगाराच्या नवीन संधी असल्याचा सूर मान्यवरांनी व्यक्त केला. गोदावरी कृषी परिसरात एक दिवशीय केळी उपपदार्थ प्रक्रिया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत अध्यक्ष म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जळगाव येथे कार्यरत तथा अग्रयान कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस व कृषी उद्योग कंपनीचे संस्थापक समाधान पाटील, तसेच प्रमुख उपस्थिती कृषी विज्ञान केंद्र मुमराबाद येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ.तुषार गोरे, अ‍ॅड. सुरेश पाटील व सेवा निवृत्त कृषी उपसंचालक जळगाव येथील अनिल भोकरे व जिल्ह्यातील उद्योजक उपस्थित होते.

महाविद्यालयातील कृषी संकुल परिसराचे परिसर संचालक तथा कार्यशाळेचे समन्वयक डॉ. एस.एम. पाटील, शिक्षण व संशोधन संचालक डॉ.अशोक चौधरी, डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथील प्राचार्य तथा कार्यक्रमाचे निमंत्रक डॉ. शैलेश तायडे, कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य व कृषी अन्नतंत्र महाविद्यालयाचे प्राचार्य, सहाय्यक कुलसचिव तथा कार्यक्रमाचे आयोजक अतुल बोंडे उपस्थित होते. या कार्यशाळेत शेतकर्‍यांसह युवक-युवतींनी सहभाग घेतला. अध्यक्षही भाषणामध्ये समाधान महाजन यांनी केळी वरती विविध प्रकारच्या, विविध प्रक्रिया करून नवउद्योजकांना काम करण्याची नवीन संधी कशी निर्माण होते? याबाबत मार्गदर्शन केले.

कृषी परिसर संकुल परिसराचे परिसर संचालक डॉ. एस. एम. पाटील यांनी केळी उत्पादक शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले. संशोधन संचालक डॉ. अशोक चौधरी यांनीही सखोल असे मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्र मुमराबादचे मुख्य अधिकारी डॉ. तुषार गोरे यांनी शासनाच्या विविध योजना बद्दल माहिती दिली. कार्यशाळेत सहभाग नोंदविलेल्या नवयुवक युवती यांना प्रमाणपत्र देण्यात आले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन अंतिम सत्रातील विद्यार्थिनी प्रगती ढवळे व सुजाता खरात यांनी केले तर आभार विस्तार शिक्षण विभागाचे प्रा.बी. एम. गोणशेटवाड यांनी मानले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here