गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूल येथे अभियंता दिवस साजरा

0
36

"

जळगाव : मुलांच्या उज्वल भविष्यासाठी गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल जळगाव मध्ये नुकताच अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. येथील वक्त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील शंकाचे निरसन झाले. गोदावरी इंग्लिश मिडीयम सीबीएसई स्कूलमध्ये दरवर्षी १५ सप्टेंबरला एम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्‍त अभियंता दिवस विविध उपक्रमांनी साजरा केला जात असून यावर्षीही गोदावरी अअभियांत्रिकी महाविद्यालय, जळगाव येथील प्राचार्य डॉ.विजय पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी डॉ.विजय पाटील म्हणाले की, मुलांना इंजीनियरिंग करण्यासाठी इयत्ता आठवी पासूनच विज्ञान, गणित हे विषय किती महत्त्वाचे आहेत, आपले करिअर कसे निवडावे, एन.आय.टी, आय.आय.टी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी पूर्वतयारी कशी करावी याबद्दल योग्य मार्गदर्शन केले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मुलांच्या मनात असलेल्या बर्‍याचशा अडचणी दूर झाल्या त्यांचे मार्गदर्शन खरंच मुलांसाठी खूप मोलाचे ठरले. या कार्यक्रमाचे आयोजन गोदावरी स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी केले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here