भाजपाचे गाव चलो अभियानातून गावपातळीच्या योजनांची जनजागृती : माजी खा. डॉ. उल्हास पाटील

0
30

"

रावेर : भाजपाच्या गाव चलो अभियानातून गाव पातळीच्या योजनांची जनजागृती होत असल्याचे मत माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी आज पाल ता.रावेर येथे केले. भाजपाचे गाव चलो अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत माजी खा. डॉ उल्हास पाटील यांनी मुक्कामी राहून भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मोदी सरकारच्या योजनांविषयी सर्वसामान्यांना माहिती दिली, बचत गटांच्या महिलांची संवाद साधून सरकारकडून होणार्‍या योजनांमुळे समृद्ध झालेल्या अनेक यशोगाथा त्यांनी विषद केल्यात, अनेक ठिकाणी दिवार लेखन केले, सर्वांसोबत रात्रीचे भोजन करून मुक्काम केला.

या वेळी मनोगतातून त्यांनी गाव चलो अभियानातून ग्रामीण संकृतीची ओळख तर होतेच परंतु ग्रामीण जनतेच्या समस्या व जीवनमान या विषयी माहिती मिळत असल्याचे सांगितले. या प्रवासात त्यांच्यासोबत नंदकिशोर चव्हाण,भ.वि.आघाडी ताअध्यक्ष,धनसिंग पवार,रावेर मंडल उपाध्यक्ष,गोमतीताई बारेला जिल्हा.सरचिटनीस,सुरेश पवार,हबीब तडवी,राजु तडवी,राहुल धांडे (शाखा अध्यक्ष), पुंडलीक सोनार, प्रमोद भिरूड आदी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here