माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या हस्ते विवरा येथे चित्रीकरणाचे पूजन

0
58

"

रावेर : तालुक्यातील विवरा येथीलयेथील श्री.ग.गो बेंडाळे हायस्कूल येथे ‘ते दहा दिवस’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पूजन आज शुभमुहूर्तावर माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. ‘ते दहा दिवस’ हा एक सामाजिक सत्य घटनेवर आधारलेला चित्रपट आहे.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मार्तंड भिरूड, चेअरमन धनजी लढे, व्ह.चेअरमन रामचंद्रराव देशमुख, सचिव शैलेश राणे, संचालक रमेश पाचपांडे, संचालक केशव राणे, संचालक दिलीप राणे, हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.एच.वायकोळे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ‘ते दहा दिवस’ या चित्रपटाच्या संपूर्ण टिमला माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here