गणेशोत्सवानिमित्त गोदावरी फाऊंडेशनतर्फे मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन ; या आजारांची होणार तपासणी

0
61

जळगाव : हे गणपती बाप्पा… तुझ्या आशिर्वाद सर्वांच्या नेहमी पाठीशी राहू दे.. यंदाचा गणेशोत्सव सर्वांना शुभदायी, लाभदायी, निरोगी आरोग्याचा जावो, या सदिच्छांसह नागरिकांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर गोदावरी फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आले आहे. त्याचा लाभ घेऊन निरोगी आरोग्याकडे पाऊल टाकावे, असे आवाहन गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील यांनी केले आहे.

गोदावरी फाऊंडेशनतर्फे तालुक्यातील लहान-मोठ्या गावांमध्ये भव्य मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन केले जात आहे. गणेशोत्सवानिमित्त सर्वांसाठीच विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन डॉ.केतकीताई पाटील यांनी केले आहे. ह्या शिबिरांमध्ये सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर्स उपस्थीत राहणार असून ईसीजी कार्डिओग्राफ, रक्तदाब तपासणी देखील मोफत केली जाणार आहे. लाडक्या गणपती बाप्पांचा आशिर्वाद सर्वांना मिळावा या सदिच्छेसह आरोग्य तपासणी शिबिरांची भेट डॉ.केतकीताईंनी उपलब्ध करुन दिली आहे. अधिक माहितीसाठी दिपक पाटील यांच्याशी ९४२२८३७७७१ या क्रमांकावर संपर्क साधावा.

सर्व आजारांची प्राथमिक तपासणी व उपचार
आरोग्य तपासणी शिबिरात कान नाक घसा विकार, नेत्रविकार, स्त्रीयांचे विकार, हाडांचे मणक्यांचे विकार, त्वचाविकार, हृदयविकार, दारुमुळे निर्माण झालेले पोटाचे विकार यासह प्लीहा, विविध प्रकारच्या गाठी, थायरॉईड, पाईल्स, भगंदर, फिशर, डायबेटिक फूट, हर्निया, अल्सर, आतडंयांमधील अडथळे, अपेंडीक्स, हायड्रोसिल अशा विविध आजारांची प्राथमिक तपासणी शिबिरात केली जाणार आहे. शिबिरातून रेफर झालेल्या रुग्णांवर महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत उपचार केले जाणार आहे.

अशी आहे शिबिरे
बुधवार, दि.२० सप्टेंबर – धनाजी नाना सार्वजनिक वाचनालय, खिरोदा प्र.यावल, वेळ सकाळी ११ ते २
गुरुवार, २१ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय, वेले आखतवाडे ता.चोपडा, वेळ – सकाळी ११ ते २
गुरुवार, २१ सप्टेंबर – देशमुख वाडा, अडावद ता.चोपडा, वेळ – सकाळी ११ ते २
शुक्रवार, दि.२२ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय, तरवाडे खुर्द ता पारोळा, वेळ – सकाळी ११ ते २
शनिवार, दि.२३ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय, लोणवाडी ता.मलकापूर, वेळ सकाळी ११ ते २
शनिवार, दि.२३ सप्टेंबर – सरदार वल्लभभाई पटेल चौक, सर्वोदय गणेश मंडळाजवळ, कुंभारस्टेक, एरंडोल, वेळ – सकाळी १० ते २
शनिवार, दि.२३ सप्टेंबर – ग्रामपंचायत कार्यालय, लोणजे ता.चाळीसगाव – वेळ सकाळी ११ ते २

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here