व्हेरीकोज व्हेन्सवर मोफत उपचार; जाणून घ्या सविस्तर

0
34

जळगाव : पायातून हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत होणे गरजेचे असते मात्र अनेकांना व्हेरीकोज व्हेन्सची समस्या असल्याने रक्तपुरवठा खंडीत होतो. कालातरांने पायाला जखमा होणे, संवेदना जाणे अशाही समस्या उद्भवतात. यातच रुग्ण जर मधुमेही असेल तर काही वेळेस संपूर्ण पायही काढण्याची वेळ येते, असे होऊ नये याकरीता आजच डॉ.उल्हास पाटील रुग्णालयातील व्हेरीकोज व्हेन्स तज्ञांशी संपर्क साधा. येथे कुठल्याही प्रकारची डॉक्टरांची फी लागत नसून संपूर्ण उपचारही महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत मोफत होतात.

सर्वसामान्य: पोलिस, शेतकरी किंवा जास्त वेळ उभे राहून काम करणार्‍या 40 ते 60 वयोगटातील महिला-पुरुषांना व्हेरीकोज व्हेन्सची समस्या उद्भवते. तसेच प्रकुतीने स्थुल असलेले आणि प्रसुतीदरम्यानही अनेक महिलांना व्हेरीकोज व्हेन्स होण्याची शक्यता अधिक असते. सुरवातीच्या काळातच डॉक्टरांशी संपर्क केला तर ग्रेड 1 मध्ये केवळ औषधोपचार देऊनही ही समस्या सुटते परंतु ग्रेड 2 मध्ये शस्त्रक्रियाशिवाय पर्याय उरत नाही.

शरिरातील रक्तातून आयरन बाहेर येवून पायाच्या एका बाजूने जखमा होतात, सुरवातीला स्वरुप लहान असले तरी कालांतराने त्याला खाज सुटून जखम मोठीही होण्याची शक्यता असते, यातच मधुमेही रुग्ण असल्यास धोके अधिक वाढतात.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here