गणपती मोरया…पुढच्या वर्षी लवकर या….

0
44

"

जळगाव : गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या गजरात आज डॉ.उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरेपीच्या विघ्नहर्त्याला भावपूर्ण निरोप देण्यात आला. यावेळी माजी खा. डॉ. उल्हास पाटील, प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांचेसह प्राध्यापक वर्ग उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी यावेळी परिसरात मिरवणूक काढली.

गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, एक दोन तिन चार गणपती बाप्पा उठले, अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. सर्वप्रथम माजी खा.डॉ. उल्हास पाटील व प्राचार्य डॉ. जयवंत नागुलकर यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. मिरवणूक सर्व वर्षाचे विद्यार्थी व प्राध्यापक सहभागी झाले होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here