गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालयामध्ये महात्मा गांधी जयंती साजरी

0
59

जळगाव । गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन येथे महात्मा गांधी यांची जयंती दिनांक २ ऑक्टोबर २०२३ रोजी साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्रचार्य डॉ.विजयकुमार पाटील, प्रा.दीपक झांबरे (समन्वयक तंत्रनिकेतन), प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक वर्ग तसेच विद्यार्थी अधिक संख्येने उपस्थित होते.

याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. महाविद्यालयातील महिमा भोईटे या विद्यार्थिनीने मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये तिने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या बद्दल सांगताना त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी गांधी जयंतीचे महत्त्व केवळ त्यांचा जन्मदिवसाचे स्मरण करण्यामध्येच नाही; तर त्यांचे नेतृत्व आणि सामाजिक न्याय व शांततेसाठी अतूट बांधिलकी ओळखण्यातही आहे.

महात्मा गांधी यांचा जन्मदिवस हा संपूर्ण जगामध्ये जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. अशा थोर व्यक्तीचे विचार आणि गुण आपण सर्वांनी नक्कीच आत्मसात करायला हवे असेही त्यांनी नमूद केले. सदर कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here