डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना महापरिनिर्वाण दिनी गोदावरीत अभिवादन

0
24

"

जळगाव । गोदावरी फॉउंडेशनच्या विविध संस्थामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न,विश्वभूषण, बोधिसत्व, योग पुरुष, अर्थतज्ञ,अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.

डॉ.उल्हास पाटील रूग्णालयात मेट्रन ऑफीस, गोदावरी नर्सिंग महाविद्यालय, डॉ. उल्हास पाटील फिजिओथेरेपी व होमीयोपॅथी महाविद्यालयात अभिवादन करण्यात आले. यावेळी गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंग आणि मेट्रन ऑफीसमध्ये काल घटनेचे शिल्पकार अ‍ॅड बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमीत्‍त अभिवादन करण्यात आले. यावेळी माजी खा.डॉ. उल्हास पाटील यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

यावेळी मेट्रन ऑफीस प्रमुख संकेत पाटील, मनिषा खरात, किर्ती पाटील, प्रतिक आढे,आकश धनगर,चिन्मय शुक्ला, प्राजक्ता जंगले, वैशाली वाघ,दिवायना पवार, एंजेला एलिस व समस्त नर्सिंग इन्चार्ज व नर्सिंग स्टाफ यांच्यासह विविध कर्मचारी व विदयार्थी उपस्थीत होते. मेणबत्‍ती व्दारे दिपप्रज्वलत करत महामानवाच्या आठवणींना यावेळी उजाळा देण्यात आला.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here