गोदावरी फाऊंडेशनतर्फे बैलपोळा सण उत्साहात साजरा

0
29

"

जळगाव : येथील डॉ. उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी श्रीमती गोदावरी पाटील यांच्या हस्ते सर्जाराजाला पुरणपोळी, सप्तधान्याचा नैवैद्य देण्यात आला.

बैलपोळा सणानिमीत्त वर्षभर शेतात राबणार्‍या सर्जाराजाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येते. या दिवशी बैलांना अभ्यंगस्नान घालून त्यांना सजविले जाते. आकर्षक झुल, घुंगरू, शिंगांना रंग देऊन बैलांची मिरवणूक काढली जातेे. डॉ. उल्हास पाटील कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात बैलपोळ्याचा सण दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो. यंदाही कृषि महाविद्यालयात पोळ्यानिमीत्त सर्जाराजाचे पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

गोदावरी परिवाराच्या आधारस्तंभ श्रीमती गोदावरी पाटील यांच्या हस्ते सर्जाराजाचे पूजन करून त्यांना पुरणपोळी आणि सप्तधान्याचा नैवैद्य खाऊ घालण्यात आला होता. यावेळी गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, परिसर संचालक डॉ. एस.एम. पाटील, प्राचार्य अशोक चौधरी, शैलेश तायडे, डॉ. पी.आर.सपकाळे, रजीस्ट्रार अतुल बोंडे, नाना सावके, मनोज अत्तरदे, प्रल्हाद खडसे, अमोल तेलगोटे, देवेंद्र भंगाळे यांच्यासह शेतकरी बांधव उपस्थित होते.

याप्रसंगी डॉ. उल्हास पाटील यांनी बैलपोळा सण आणि सर्जाराजाची महती विशद करीत लंपी या आजारापासून आपल्या पशुधनाला वाचविण्यासाठी त्यांची अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तसेच लंपीची लक्षणे आढळून आल्यास त्वरीत वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधावा असा सल्लाही डॉ. उल्हास पाटील यांनी यावेळी दिला.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here