जळगाव : महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व परावैदिक शिक्षण मंडळाचा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यात गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाचा ९६ टक्के निकाल लागला. यात रिना नारखेडे ८३.६% मिळवत महाविद्यालयातून प्रथम तर तृप्ती गिरडे ८२.८% व्दितीय, आरती अडकमोल ८२.६% तृतीय श्रेणी आणि जागृती बेहरे, प्राची कांबळे, प्रेरणा बाविस्कर तसेच अंकीता टेंभारे या विद्यार्थिंनी डिस्टिंग्शनमध्ये आहेत.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष माजी खा. डॉ उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, सदस्या डॉ. केतकी पाटील, डॉ. वैभव पाटील, डॉ. अनिकेत पाटील, डॉ अक्षता पाटील यांच्यासह प्राचार्य प्रो. विशाखा गणविर, प्रशासन अधिकारी प्रविण कोल्हे यांच्यासह सर्व शिक्षकवृंद यांनी आनंद व्यक्त करत अभिनंदन केले आहे.