गणित प्रतिभा तपासणी परीक्षेत गोदावरी स्कूलच्या विद्यार्थ्यांना सुवर्णपदक

0
31

"

जळगाव : गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, मधील विद्यार्थ्यांनी आयएफएसी गणित प्रतिभा तपासणी (IFSC mathematical talent Probe exam) २०२३-२४ परीक्षेत सहभाग घेऊन सुवर्णपदक प्राप्त केले. यात इयत्ता पहिलीतील पाटील मोक्ष तुलसीराम, चौधरी ओम भूषण, इयत्ता चौथीतील माने गौरव महेंद्र, बोंडे एक्नेश हेमंत, परदेशी रुद्र प्रताप सिंग सतीश, उमर शेख अब्दुल मजीद, व इयत्ता आठवीतील बोरले हेतिश राजेंद्र यांना प्रमाणपत्र व सुवर्णपदक प्राप्त झाले आहे.

त्यांनी प्राप्त केलेल्या यशामुळे त्यांचे गणित या विषयाबद्दल किती सखोल ज्ञान आहे याची जाणीव होते. गणित हा विषय योग्य रीतीने हाताळला तर तो किती सोपा आहे त्यात यश मिळवणे किती सहज आहे हे या चिमूरड्यांनी आपल्या यशातून दाखवून दिले. त्यांनी प्राप्त केलेल्या या यशाबद्दल स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी आणि सर्व शिक्षक वृंदांनी त्यांचे अभिनंदन केले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here