अमळनेरला १५ रोजी आरोग्य तपासणी शिबिर

0
58

"

अमळनेर : गोदावरी फाऊंडेशन, डॉ.अनिल शिंदे मित्र परिवार आणि अमळनेर युवक काँग्रेस यांच्या संयुक्‍त विद्यमाने रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते २ या वेळेत नर्मदा मेडिकल फाऊंडेशन, यशवंत नगर येथे महाआरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले आहे.

या शिबिरात मुखतडा, मुत्रपिंडातील खडे, प्रोस्टेट, पित्‍ताशय खडा, हर्निया, अल्सर, पाईल्स, भगंदर, थायरॉईड, अपेंडीक्स यासह कान नाक घसा, नेत्रविकार, अस्थिविकार, मणका विकार, स्त्रीयांचे आजार, हृदयविकार, दारुमुळे निर्माण झालेले आजार, मानसिक आजार, त्वचाविकाराची तपासणी व उपचार शिबिरात केले जाणार आहे. याशिवाय ईसीजी कार्डिओग्राफ व रक्‍तदाब तपासणीही मोफत केली जाणार आहे.

शिबिरासंदर्भात अधिक माहितीसाठी माजी युवक अध्यक्ष सईद तेली, युवक काँग्रेस शहराध्यक्ष तौसिफ तेली, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश पाटील, मिडीया सेल अध्यक्ष तुषार संदानशिव यांच्याशी संपर्क साधावा. शिबिराच्या नावनोंदणीसाठी ०२५८७-२२३०९७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here