आत्महत्या कशा रोखता येतील? गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगमध्ये चर्चासत्र

0
51

जळगाव : जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त, गोदावरी कॉलेज ऑफ नर्सिंगच्या मानसिक आरोग्य नर्सिंग विभागातर्फे शासकिय वैद्यकिय व नर्सिग महाविद्यालयात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्त्या मानसोपचार सल्‍लागार ज्योती पाटील शा.म.वै.म. गोदावरी नर्सिंगच्या मानसिक आरोग्य विभागप्रमुख प्रा. अश्‍वीनी वैदय, सहायक प्रा. सुमित निर्मळ, प्रा.प्रशिक चव्हाण, व्याख्याता प्रा शिल्पा वैरागडे, प्रा. प्रियंका गाडेकर, प्रा सूरज खवाटे, प्रा ओकांर मुरूडकर हे उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करतांना ज्योती पाटील यांनी आत्महत्यांची कारणे, लक्षणे व उपायावर बोलतांना व्यसन व मानसिक ताण तणावामुळे आत्महत्यासारखे टोकाचे पाउल उचलले जावू शकते. या आत्महत्या रोखण्यासाठीचे उपाय विषद करतांना मागास भागात जावून जनजागृती तर आवश्यकच आहे परंतू मानसोपचार तज्ञांचा सल्‍ला व भुमिका ही अत्यंत आवश्यक झाली आहे.

स्पर्धेच्या या युगात मानसिक रूग्णामध्ये वाढ होत जावून आत्महत्येचे प्रमाणही वाढले असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रा प्रियंका गाडेकर यांनी केले. मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ देवून करण्यात आले. प्रास्तविकात प्रा सुमित निर्मळ यांनी ज्योती पाटील यांचा परिचय करून दिला. या चर्चासत्रात व्दितीय वर्षाचे सर्व विदयार्थी सहभागी झाले होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here