गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आविष्कार २०२४ संपन्न

0
85

जळगाव : विद्यार्थ्यांना संशोधन म्हणजे काय संशोधन पद्धती कशा असतात नवनवीन संशोधन कसे करता येऊ शकते या गोष्टी शिकायला मिळाव्यात त्यांच्यात संशोधनाची आवड निर्माण व्हावी या हेतून क.ब.उ.म.वि आयोजित अविष्कार २०२४ महाविद्यालय स्तरावर गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील हे उपस्थित होते. त्यांच्यासोबत डॉ. अनिल कुमार विश्वकर्मा (प्रमुख, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स), प्रा. महेश पाटील (प्रमुख, विद्युत विभाग), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा. निलेश वाणी (संगणक विभाग प्रमुख) तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग व सहभागी विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन करण्यात आले.पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.

प्रास्ताविकात प्रा. नेमीचंद सैनी (अविष्कार समन्वयक) यांनी विद्यार्थ्यांना अविष्कार स्पर्धेसंदर्भात माहिती देताना वेगवेगळ्या स्तरावर ही स्पर्धा घेण्यात येवून विजेत्या स्पर्धकांना उत्कृष्ट पारितोषिक राज्यस्तरीय स्तरावर दिले जाते. त्याचप्रमाणे या स्पर्धेचे स्वरूप विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधीत करताना विद्यार्थी दशेत असताना संशोधनावर काम करणे, तसेच नवनवीन गोष्टी शिकणे गरजेचे ठरते, देशपातळीवर वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन होत आहेत, अशा प्रकारच्या स्पर्धांच्या माध्यमातूनच विद्यार्थी देशपातळीवरील स्पर्धांसाठी तयार होत असतात असेही सांगितले.विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या स्पर्धांमध्ये नियमित सहभाग नोंदवावा व विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.त्यानंतर सहभागी विद्यार्थ्यांनी त्यांच्या पोस्टर्सचे सादरीकरण केले.

सर्व विभागाच्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदविला.सदर कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक म्हणून प्रा. राजेंद्र पाटील व प्रा. माधुरी झवर तसेच निरीक्षक म्हणून प्रा. तुषार कोळी यांनी काम पाहिले.अविष्कार प्रथम फेरीचे विजेते प्रथम क्रमांक १. वैष्णव चौधरी (विद्युत विभाग)द्वितीय क्रमांक २. सुहास सोळंके (अणूविद्युत व दूरसंचार) सदर कार्यक्रमाचे नियोजन विद्युत विभागाचे प्रा. नेमीचंद सैनी यांनी प्रा. महेश पाटील तसेच डॉ. विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. सचिन महेश्री, प्रा. किशोर महाजन, प्रा. निलेश चौधरी, प्रा. व्ही डी चौधरी त्यांनी सहकार्य केले.सदर कार्यक्रमाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर व सदस्य डॉ. केतकी पाटील मॅडम यांनी कौतुक केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रथमेश पवार या विद्यार्थ्याने केले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here