गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात

0
27

"

जळगाव : डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या (बाटू) आंतर महाविद्यालयीन कबड्डी व बुद्धिबळ स्पर्धा मंगळवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्याल जळगांव येथे उत्साहात संपन्न झाल्या. यात जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील तंत्रशास्त्र महाविद्यालयातील २८० खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांचे हस्ते झाले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बाटू विद्यापीठाच्या क्रीडा मंडळाचे सदस्य डॉ.व्ही.व्ही.महाजन, जळगाव जिल्हा कबड्डी असोसिएशनचे प्रा. हरिश शेळके, प्रा. सोनार, प्रा. निलेश जोशी, प्रा. राठोड़, आंतराष्ट्रीय आर्बिटर प्रवीण ठाकरे, रजिस्ट्रार डॉ. ईश्वर जाधव यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे सूत्रंसचालन क्रीडासंचालक तथा स्पर्धा आयोजक डॉ. आसिफ खान यांनी केले. स्पर्धेत पंच म्हणून जळगाव जिल्हा कबड्डी व बुद्धिबळ असोसिएशनचे पंच यांनी काम पाहिले. गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे महिला कबड्डी संघ स्पर्धेत विजय जळगांव विभाग आंतर महाविद्यालय कबड्डी क्रीडा स्पर्धेत गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाने अंतिम सामन्यात एस.एस.बी.टी. फार्मेसी महाविद्यालय बांभोरी ला २७-९ ने पराभूत केले.एस.वी. के. एम. अभियांत्रिकी महाविघालयचे (पुरुष) कबड्डी संघ स्पर्धेत विजय अंतिम सामन्यात एस.वी. के. एम. अभियांत्रिकी महाविद्यालयाने एस.एस.वी.पी.एस. अभियांत्रिकी महाविद्यालयाला २४-६ ने पराभूत केले. बुद्धिबळ मध्ये गोदावरीच्या पुरुष व महिला सांघने तृतीय क्रमांक पटकवला. गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील यांनी खेळाडुंचे यशाबद्दल अभिनंदन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व जळगाव जिल्हा कबड्डी अससोसिएशन, जळगाव जिल्हा बुद्धिबळ अससोसिएशन यांनी परिश्रम घेतले. फोटो कॅप्शन – कबड्डी स्पर्धेत विजयी (पुरुष व महिला) संघा सोबत मान्यवर.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here