गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात पॅरेंन्ट्स मिटिंग

0
25

"

जळगाव : गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये बीएस्सी नर्सिंगसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी गुरुवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पॅरेंन्ट्स मिटिंग आयोजित करण्यात आली होती. शिक्षकांसह पालकांमधील सुसंवादामुळे ही सभा खेळीमेळीच्या उत्साहाच्या वातावरणात पार पडली. गोदावरी नर्सिंग महाविद्यालयाच्या उपप्राचार्या प्रा.विशाखा वाघ, प्रा.शिवानंद बिरादर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे, प्रा.अश्विनी मानकर यांच्या अध्यक्षतेखाली पॅरेंन्ट्स मिटिंग घेण्यात आली.

आपल्या पाल्याच्या शिक्षणास सुरुवात झाली असून त्यांचे शिक्षक, शिक्षण पद्धती, सोयी-सुविधा, विद्यार्थ्यांसाठीची शिस्त या सर्वांची माहिती पालकांनाही व्हावी या उद्देशाने ही सभा झाली. याप्रसंगी पालकांनी देखील शिक्षकांशी सुसंवाद साधून पाल्याच्या प्रगतीबाबत जाणून घेतले. विद्यार्थ्यांनी देखील आपआपल्या शिक्षकांशी पालकांची ओळख करुन दिली. या पॅरेंन्ट्स मिटिंगसाठी महाविद्यालयातील सर्व विभागाचे प्रमुख तसेच प्राध्यापकवृंद यांच्यासह प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसह पालक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here