चोपड्यातील रथोत्सवाचे डॉ.केतकीताई व डॉ वैभव पाटील यांच्याहस्ते पूजन

0
42

"

जळगाव : रावेर लोकसभा मतदारसंघातील चोपडा येथे बुधवार दिनांक २५ ऑक्टोबर रोजी श्री बालाजी रथोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पारंपरिक रथाची पूजा गोदावरी फाऊंडेशनच्या सदस्या डॉ.केतकीताई पाटील व त्यांचे पती डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी आमदार लताताई सोनवणे, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, प्रांताधिकारी एकनाथ भंगाळे, तहसीलदार, पो. नि. के. के. पाटील, प्रवीणभाई गुजराथी, चंद्रहासभाई गुजराथी, भुपेंद्रभाई गुजराथी, मनीष पारीख, सुनील बरडीया यांच्यासह रथाचे मानकरी जितेंद्र देशमुख आदि उपस्थित होते.


श्री बालाजी मंदिरात महिला मोठ्या भक्तिभावाने भजन गात होत्या तर मंदिरा बाहेत रथा जवळ भाविकांनी श्री बालाजी भगवान की जय अशा या घोषणांनी परिसर दणाणून टाकला. दोन दिवस चालणार्‍या रथोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. याशिवाय चोपडा शहरातील पुरातन अशा आनंदी भवानी माता मंदिराचे डॉ.केतकीताई पाटील व त्यांचे पती डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील यांनी दर्शन घेतले, यावेळी संस्थेचा सत्कार स्वरूपात आशीर्वाद स्वीकारला. याप्रसंगी संस्थानाचे खजिनदार भूषण चिंटू पाटील, चोपडा व्यापारी मंडळाचे संचालक मुरलीभाई गुजराती, पुजारी संतोष नारायण पालेवार, श्रीकांत धर्माधिकारी आदींची उपस्थिती होती.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here