किशोरवयीन मुलांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ?

0
106

मित्रांनो, जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस हा २००३ पासून दरवषी १० सप्टेंबर रोजी पाळला जाणारा जागरूकता दिवस आहे. आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरूक करणे, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोने २०२१ या वर्षात झालेल्या आत्महत्येची आकडेवारी जाहीर केली. त्या अहवालानुसार देशात तब्बल १ लाख ६४ हजार आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या असून त्यानंतर तामिळनाडू आणि मध्यप्रदेश याचा नंबर लागतो. वृद्ध नागरिकांमध्ये आत्महत्येचा धोका अधिक असतो, असे मानले जात होते. मात्र आता तरुण आणि किशोरवयीन मुलेही आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू लागले आहेत. देशात १८ ते ३० वयोगटातील ५६ हजाराहून अधिक युवकांनी तर १८ वर्षाखालील १० हजाराहून अधिक किशोरवयीन मुलांनी आत्महत्या केल्याचे दिसते. तर आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाच्या निमित्ताने किशोरवयीन मुलांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे ते पाहू.

व्यक्ती आत्महत्या का करतात?
आत्महत्येचे कारण हे वृद्धांसाठी वेगळी, तरुणांसाठी वेगळी तर किशोरवयीन मुलांमध्ये वेगळी असू शकतात. पण त्यामध्ये एक सामान्य गोष्ट म्हणजे अत्याधिक ताण, सामाजिक संबंध कमी झाले आहे, त्यामुळे एकटेपणा हा वाढीस लागला आहे. लोकांमध्ये माझ्या समस्येचे तात्काळ समाधान झाले पाहिजे हि भूमिका वाढली आहे त्याची सहनशीलता संपली आहे. एखादी अशी गोष्ट जी ते इतरांजवळ बोलू शकत नाही. त्याची मनात होणारी घुसमट ते व्यक्त करू शकत नाही. आणि मनात होणारी हि घुसमट हि एक दिवसात निर्माण होत नाही, अनेक दिवसांपासून ते मनात साचत गेल्याने शेवटी एक दिवस त्याचा स्फोट होतो. मनावरीलहा ताण एवढा वाढतो कित्यांना त्या समस्यालातोंड देण्यापेक्षा जीवन संपवणे सोपे वाटते आणि म्हणूनच ते असे टोकाचे पाऊल उचलतात. तर आज जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवसाच्या निमित्ताने किशोरवयीन मुलांना आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे ते समजून घेऊ.

किशोरवयीन मुलांमध्ये आत्महत्येचे कारण काय?
बहुतांश टीनएजर्स/किशोरवयीन मुले हि मानसिक अवस्थेमुळे आत्महत्येसारखे गंभीर टोकाचे पाऊल उचलतात. त्यामध्ये अत्याधिक तणाव, नकार मिळणे, अपयश मिळणे, ब्रेकअप होणे, शाळेतील त्रास, कुटुंबातील समस्या, करियरची चिंता, मेंटल डिसऑर्डर या सारख्या इतर अनेक कारणांचा समावेश असू शकतो. ज्या किशोरवयीन मुलांनी एकदा आत्महत्येचा प्रयत्न केला आहे, ते परत अशी कृती करण्याचा धोका अधिकअसतो. पालकांनीअशा प्रकरणात विशेष काळजी घेतली पाहिजे.

लक्षणे
आत्महत्येबद्दल लिहणेकिंवा बोलणे, स्वभावात खूप जास्त बदल होणे
सोशल लाईफ पासून दूर राहणे, मद्यपान, अमली पदार्थांचे सेवन करणे
खूप मूड स्विंग मुळे त्रस्त होणे, खाण्या-पिण्याचे तसेच झोपण्याचे पॅटर्न बदलणे
निराश व असहाय्य वाटणे, स्वतःला त्रास, जखम करण्यासारखी कृती करणे
अधिक ताण, नैराश्य वाटणे, अचानक मित्र बदलणे

मुलांना आत्महत्येपासून रोखण्याचे उपाय

•मानसिक आरोग्याबद्दल बोलावे
पालकांनी त्यांच्या मुलांशी मेंटलहेल्थ म्हणजेचमानसिक आरोग्याबद्दल बोलले पाहिजे. जर मुलं मानसिकरीत्या त्रस्त किंवा दुखी असतील, नैराश्याशी लढा देत असतील तर पालकांनी त्यांची मदत केली पाहिजे आणि योग्य मार्ग दाखवला पाहिजे. समस्या वाढण्यापूर्वी डॉक्टरांना दाखवावे, तज्ज्ञांना भेटून त्यांच्याशी बोलून या विषयावरील टिप्स घेता येऊ शकतात.

•मुलांना एकटंसोडू नका
मुलांमध्ये आत्महत्येची कोणतीही लक्षणं दिसत असतील तर पालकांनी त्यांच्या कडे गंभीरपणे लक्ष दिले पाहिजे आणि समस्या दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तसेच त्यांना एकटे राहण्यापासून रोखावे आणि सतत त्यांच्या आसपास राहावे. त्याच्या जवळ अशी कोणतीही गोष्ट ठेवू नये ज्यामुळे ते स्वतःला नुकसान करून घेऊ शकतात.

•सोशल मीडियावर लक्ष्य ठेवा
किशोरवयीन मुलांसाठी सोशल मीडिया तणावाचे प्रमुख कारण बनत आहे. अनेक जण सोशल मीडियावर आपल्याला न बोलता आलेल्या भावना व्यक्त करतात, त्यावर पालकांनी लक्ष्य ठेवायला हवं. सोशल मीडियावर मुलांना कोणी त्रास देत असेल, दादागिरी, धमकी देत असेल तर पालकांनी त्याबद्दल मुलांशी बोललं पाहिजे.

•निरोगी जीवनशैलीसाठी मुलांना प्रोत्साहित करा
मुलांनी योग्य वेळी झोपणे, खाणे-पिणे आणि व्यायाम केल्याने मानसिक समस्या दूर होतात, या सवयी त्यांना आत्महत्येसारखे विचार दूर ठेवण्यास मदत करतील अश्या निरोगी जीवनशैली साठी मुलांना पालकांनी प्रेरित केले पाहिजे.

तर अशा आत्महत्या रोखण्यासाठी सरकारने देखील पाऊले उचली आहेत. भारत सरकार आणि महाराष्ट्र राज्य सरकार यांनी मानसिक आरोग्यावर टेली-मानस कार्यक्रम याची सुरवात केली आहे. त्यांचा टोल फ्री क्र १४४१६ किंवा १८००८९१४४१६ हे आहेत. त्यात तुम्ही निसंकोच कॉल करून मन मोकळे बोलू शकतात. या बरोबरचअनेक छॠज या साठीकाम करत आहेत. तुम्ही मानसोपचार तज्ञ, समुपदेशक याची मदत घेऊ शकतात. यामुळे तुम्ही व्यक्त झाल्याने, मनातील बोलल्यामुळे स्वतः अनुभव करीत असलेला मानसिक ताण कमी होऊन आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्यापासून निश्चित परावृत्त नक्की व्हाल.

मानसोपचार विभाग, डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालय

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here