डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयांच्या कृषीकन्यांकडून मतदार दिनानिमित्त जनजागृती

0
30

जळगाव । येथील डॉ.उल्हास पाटील महाविद्यालयाच्या कृषिकन्यानी हंबर्डी आणि हिगोण्यात राष्ट्रीय मतदार दिनानिमीत्‍त प्रबोधन करीत मतदारांना त्यांच्या हक्‍काची जाणीव करून देत जनजागृती केली.

हंबर्डी गावात मतदार राजा जागा हो लोकशाही चा धागा हो, व्होट फॉर फुचर, व्होट फॉर डेवलपमेंट,व्होट फॉर बेटर इंडीया अशी घोषवाक्याचा उपयोग करीत फेरी काढण्यात आली. डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयातील कृषीकन्या प्रियंका विजय पाटील,किमया अनिल नांद्रे, यज्ञश्री मुरलीधर महाजन, भाग्यश्री चंद्रशेखर साबळे, जानकी विजय विसपुते यांनी लोकांमध्ये मतदानाचे महत्व सांगून जनजागृती निर्माण केली. मतदान करणे हे प्रत्येक अठरा वर्षे पूर्ण केलेल्या आणि मतदार यादीत नाव असणार्‍या व्यक्तीला मत देण्याचा अधिकार आहे धर्म, जात, वर्ण संप्रदाय अथवा लिंग या निकषावर न करता कुणालाही हा अधिकार बजावता येऊ शकतो अशे कृषीकन्यानी गावकर्‍यांना पटवून दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे, कार्यक्रम समनव्यक प्रा. बी. एम. गोणशेटवाड, कार्यक्रम अधिकारी प्रा. ए. डी.मत्ते व संबंधित विषयातील विषय विशेष तज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

हिंगोने ,तालुका यावल तुमचे मत तुमचा अधिकार कृषी कन्या योगिता लिपने, वृंदा मोट्ठे ,आकांक्षा सोनवणे, रेवती ठाकरे, वैष्णवी ठोकळ, यांनी गावात जाऊन तेथील गावकर्‍यांना मतादार व मतदानाचे महत्त्व सांगितले त्याचप्रमाणे गावकर्‍यांना मतदान कार्डाची नोंदणी व वयोमर्यादा किती असते याची देखील सविस्तर माहिती सांगितली महाविद्यालयाचे प्रा.डॉ. शैलेश तायडे कार्यक्रम समन्वयक प्राध्यापक बी. एम गोणशेठवाड कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक ए .डी मत्ते व संबंधित विषयातील विशेषतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला.

राष्ट्रीय बालिका दिवस साजरा
जिल्हा परिषद मराठी मुलींची शाळा, हिंगोने येथे राष्ट्रीय बालिका दिवस साजरा करण्यात आला . या वेळी मुख्याध्यापिका सौ.सुनंदा जावळे , तसेच शिक्षिका प्रतिभा चौधरी आणि डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जलगांव यांच्या कृषी कन्या योगिता लिपणे,वृंदा मुट्ठे,आकांक्षा सोनवणे, रेवती ठाकरे आणि वैष्णवी ठोकळ यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला या निमित्ताने शाळेच्या मुख्याध्यापिका तसेच इतर शिक्षिका वर्ग व विद्यार्थिनी सोबत काही कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमानिमित्त कृषी कन्यांनी चॉकलेट वाटप करून हा दिवस साजरा केला तसेच हा कार्यक्रम ग्रामीण जागरूकता कार्यनुभव कार्यक्रम २०२३-२४ यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे ,कार्यक्रम समन्वयक प्रा. बी. एम. गोनशेटवाड, ए.डी. मत्ते व संबंधित विषयातील विशेषतज्ञ यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here