गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात संविधान पत्राचे सामूहिक वाचन

0
63

जळगाव : स्वतंत्र भारताच्या इतिहासातील २६ नोव्हेंबर हा विशेष दिवस आहे. संविधानामुळे देशात राहणार्‍या प्रत्येक नागरिकाला समान अधिकार मिळाला आहे. त्यामुळे आजच्या तरुण पिढीमध्ये संविधानाची मूल्ये रुजविण्याकरीता गोदावरी नर्सिंग महाविद्यालयात रविवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस हा विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी गोदावरी नर्सिंग महाविद्यालयातील प्राचार्य, उपप्राचार्या, संचालक शिवानंद बिरादर, प्रशासकीय अधिकारी प्रविण कोल्हे यांच्यासह विद्याथी संविधान दिनानिमित्‍त आयोजित सोहळ्याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

याप्रसंगी संविधान पत्रकाचे सामूहिक वाचन करण्यात आले. तसेच संविधान अंगीकारण्याबाबत शपथही विद्यार्थ्यांनी घेतली. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी संविधान दिनाबद्दलची माहिती मनोगताद्वारे दिली. यात देशाच्या संविधान निर्मितीसाठी महत्वाची भूमिका बजावणारे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना देखील यावेळी अभिवादन करण्यात आले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here