येवतीच्या लोकनियुक्‍त सरपंच साधना धामोळे यांचा डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते सत्कार

0
27

"

जळगाव : नुकत्याच पार पडलेल्या ग्रा.प निवडणूकीत येवती ता. बोदवड येथून राष्ट्रवादी कॉग्रेसच्या नव व लोकनियुक्‍त सरपंच म्हणून साधना प्रमोद धामोडे या निवडून आल्यात. माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांनी आज गोदावरीत सत्कार केला. आज त्याचे पती राष्ट्रवादीचे प्रवक्‍ता व माजी ता. अध्यक्ष प्रमोद धामोडे यांनी वैद्यकिय महाविद्यालयात येवून कॉग्रेस प्रदेश उपाध्यक्ष माजी खा. डॉ. उल्हास पाटील यांची भेट घेउन आर्शिवाद घेतले.

साधना धामोडे यांच्या निवडीबददल प्रमोद यांचा डॉ. उल्हास पाटील व हदयरोग तज्ञ डॉ. वैभव पाटील, प्रशासन अधिकारी प्रमोद भिरूड यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देउन सत्कार केला. यावेळी झालेल्या चर्चेत प्रमोद धामोडे यांनी निवडणूकीचा पुर्ण तपशिल प्रदेश अध्यक्ष माजी खा. यांच्या समोर मांडतांना आगामी काळातील धोरणाबददल चर्चा केली. यावेळी त्यांचे सोबत शंकर रमेश खरात तसेच विकास काशिनाथ राजोरे यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थीत होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here