गोदावरी स्कूलमध्ये कथाकथन स्पर्धा उत्साहात

0
34

"

जळगाव : गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, जळगाव येथे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना, स्टेज डेरिंग, आत्मविश्वास, भाषण कौशल्याला वाव मिळावा आणि त्यांच्यातील सुप्त गुणांची मुक्त उधळण करता यावी यासाठी इंग्लिश क्लब अंतर्गत कथाकथन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले हातेे. यात इयत्ता पहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. या स्पर्धेत मानवी जीवन आणि सामाजिक स्थिति यांची सांगड घालून मानवी मूल्यांना स्पष्ट करण्याचे काम करतात. गोदावरी इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल, जळगाव येथील मुलांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कथा उत्कृष्ट पद्धतीने सादर केल्या.

स्पर्धेला प्रमुख अतिथी म्हणून मंगला साबळे व अनुप रॉय उपस्थित होते. त्यांनीही मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले. स्कूलच्या प्राचार्य नीलिमा चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इंग्लिश क्लबच्या सुवर्णा बडगुजर, दिपाली कुलकर्णी यांच्यासह सर्व शिक्षक वर्गाने परिश्रम घेतले. स्पर्धेमध्ये विजेत्या मुलांना प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here