डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाचे खेळाडू फूटबॉल स्पर्धेत करणार म. आ. वि. विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व

0
12

"

जळगाव । ऑल इंडिया युनिर्व्हसिटीतर्फे आयोजित फूटबॉल टुर्नामेंटसाठी डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयाचे विद्यार्थी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे सप्टेंबर महिन्यात लातूर येथील एमआएमएसआर महाविद्यालयात झालेल्या फूटबॉल ट्रायलमध्ये डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातील खेळाडू यशस्वी झाल्याचे पत्र पात्र झाले आहे. यात पृथ्वीराज शंकर थोरात, अमित सुनिल साखरे, शिवम योगेश पाटील, चंदन व्ही मोरया या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे खेळाडू आगामी काळात होणार्या फुटबॉल टुर्नामेंटमध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्रतिनिधीत्व करणार असून ही महाविद्यालयासाठी गौरवास्पद बाब आहे.

त्याबद्दल गोदावरी फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा माजी खासदार डॉ.उल्हास पाटील, उपाध्यक्ष सुभाष पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्या डॉ.केतकीताई पाटील, डीएम कार्डिओलॉजिस्ट डॉ.वैभव पाटील,वैद्यकिय संचालक डॉ. एन एस आर्विकर, अधिष्ठाता डॉ.प्रशांत सोळंके, प्रशासकीय अधिकारी प्रमोद भिरुड, क्रीडा संचालक सुरेंद्र गावंडे आदिंनी अभिनंदन केले.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here