जळगाव : विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा व आपल्या कलागुणांचा बळावर कोणाच्या आत दडलेल्या प्रतिमेला आहे नवीन मिळावे तसेच आपल्या सुप्त गुणांना चालना मिळावी या हेतूने महाविद्यालयांमध्ये उल्हास 2K24 (स्नेहसंमेलन) याचे आयोजन विद्यार्थ्यांसाठी दिनांक 20-24 फेब्रुवारी 2024 यादरम्यान करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या कल्चरल नाईट च्या उद्घाटनाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील सर हे उपस्थित होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्री किशोर ढाके (CEO, सोयो सिस्टीम) हे उपस्थित होते. तसेच विशेष अतिथी म्हणून श्री संदीप गावित (Deputy Superintendent of Police)
त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत डॉ.वर्षा पाटील (सचिव, गोदावरी फाउंडेशन) डॉ.केतकी पाटील (सदस्य, गोदावरी फाउंडेशन), डॉ.वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजिस्ट), श्री अनिल पाटील, सौ. अलका पाटील, डॉ. प्रशांत सोळंके (अधिष्ठाता, डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज), श्री. प्रमोद भिरुड, डॉ.प्रशांत वारके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे (समन्वयक तंत्रनिकेतन), प्रा. ललिता पाटील (समन्वयक, उल्हास 2K24), स्वप्निल महाजन (समन्वयक, उल्हास 2K24) सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचा हस्ते दीप प्रज्वलन करून कल्चरल नाईट चे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ.विजयकुमार पाटील यांनी महाविद्यालयांमध्ये मागील वर्षातील घडामोडींचा अहवाल सादर केला. तसेच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून महाविद्यालयाचा चढता आलेख याबद्दल सविस्तर माहिती दिली. व अशा प्रकारचे उपक्रम महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी सदोदित राबवेल असे सांगितले. त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. प्रशांत सोळंके यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, आपण स्वतःमध्ये गुणवत्ता जोपासायला हवी. या गुणवत्तेच्या आधारावरच आपण जगामध्ये वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवू शकतो.
त्यानंतर श्री किशोर ढाके यांनी स्नेहसंमेलन संदर्भात सांगताना जुन्या आठवणींना उजाळा दिला. डॉ.उल्हास पाटील सरांबद्दल बोलताना सांगितले की ते एक दीपस्तंभ आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांचे जवळून निरीक्षण करून त्यांच्यापासून स्फूर्ती घेणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी उद्योजकतेकडे वळावे व देशाच्या जडणघडणीमध्ये सहभाग नोंदवावा असे त्यांनी नमूद केले. भविष्यात विद्यार्थ्यांनी आपली उत्तम कामगिरी करून सर्वोच्च बिंदू आत्मसात करण्यासाठी आवाहन केले.
त्यानंतर श्री संदीप गावित यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रशासकीय सेवेबद्दल माहिती दिली. तसेच महाविद्यालय शैक्षणिक सेवेचे 25 वर्ष पूर्ण करीत आहे त्याबद्दल शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे काही प्रेरणात्मक गोष्टी सांगत विद्यार्थ्यांना प्रेरित करताना सोशल मीडियाचा वापर योग्य पद्धतीने करावा असे आवाहन केले.त्यानंतर गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील सर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घ्या, परंतु त्यासोबतच करिअर संदर्भात गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच त्यांनी 25 वर्षांपूर्वी पहिल्या स्नेहसंमेलनाच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे शिस्तप्रियेचे जीवनामध्ये अमूल्य स्थान आहे याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
या चार दिवस चालणाऱ्या गॅदरिंग मध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. त्यात त्यांनी नृत्याविष्कार, गायन कौशल्य तसेच एकांकिका असे विविध प्रयोग सादर केले. त्याचप्रमाणे कार्यक्रमादरम्यान मागच्या शैक्षणिक वर्षात उत्तम कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना स्टुडन्ट ऑफ द इयर सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले.
स्टुडन्ट ऑफ द इयर
डिग्री
वैष्णव चौधरी (अंतिम वर्ष विद्युत)
काजल विश्वकर्मा (अंतिम वर्ष यंत्र)
डिप्लोमा
हिमांशू कावळे (अंतिम वर्ष संगणक)
नेहा पाटील (अंतिम वर्ष संगणक)
कल्चरल इव्हेंट विजेता
सोलो सिंगर
प्रथम- संध्या ब्राह्मणे
द्वितीय- रुद्र पाटील
सोलो डान्स
प्रथम – दीक्षा रामराजे
द्वितीय – ललित सुळकर
ग्रुप डान्स
प्रथम – पुनम जाधव अँड ग्रुप
द्वितीय – दुर्गेश जाधव अँड ग्रुप
या स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्रा. ललिता पाटील व प्रा. स्वप्निल महाजन, तसेच त्यांच्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून दिपाली खोडके (गॅदरिंग चेअरमन),
गणेश. राज पाटील, कोणीका पाटील (कल्चरल सेक्रेटरी) तंत्रनिकेतन तर्फे मृगेश पाटील, वंश येवले, लक्ष्मी फेगडे, हेमंत रघुवंशी आणि मिताली चौधरी यांनी परिश्रम घेतले. त्यांच्यासोबत इतर समित्यांचे प्रमुख व विद्यार्थी यांनी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतलीकल्चरल नाईट च्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोणीका पाटील, वजीहा सय्यद, तुळजा महाजन, सानिका कासार, प्राची गिरासे, श्वेता बोरसे व गणेश राज पाटील यांनी केले. त्यांना प्रा. शफिकुर रहमान व प्रा. सुरज चौधरी यांचे सहकार्य लाभले