जळगाव : येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय व तंत्रनिकेतन मध्ये सीएनसी प्रोग्रामिंग अॅन्ड मशिनिंगवर विद्यार्थ्यांसाठी आयोजित कार्यशाळा उत्साहात पार पडली. सदर कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. किशोर महाजन हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी महाविद्यालयाचे अधिष्ठाता प्रा.हेमंत इंगळे, प्रा. दीपक झांबरे (समन्वयक तंत्रनिकेतन), प्रा. तुषार कोळी (यंत्र विभाग प्रमुख), प्रा.कैलास मखिजा (यंत्र विभाग प्रमुख, तंत्रनिकेतन) सर्व अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन चे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. तुषार कोळी यांनी सीएनसी मशिनिस्ट व प्रोग्रामर या दोन बाबींवर प्रकाश टाकताना विद्यार्थ्यांना सांगितले की, बाहेरील इंडस्ट्रीमध्ये या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. तसेच सीएनसी प्रोग्रामर एरोस्पेस इंजिनिअरिंग, ऑटोमोटिव्ह सेक्टर, मेडिकल तसेच एनर्जी आणि अजूनही इतर क्षेत्रांमध्ये गरजेचे असतात. तसेच विद्यार्थ्यांशी हितगुज करताना त्यांनी विद्यार्थ्यांना अशा विविध कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी मार्गदर्शन केले.
त्यानंतर कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रा. किशोर महाजन यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये सीएनसी मध्ये वापरण्यात येणारे जी कोड व एम कोड या संदर्भात सविस्तर माहिती दिली. त्यानंतर काही ड्रॉइंग्स विद्यार्थ्यांना दाखवून जी कोड व एम कोड या ठिकाणी कसे अप्लाय करता येतील या संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी सीएनसी लेथ दि सीएनसी मायलिंग या संदर्भात विद्यार्थ्यांना संपूर्ण माहिती दिली.
कार्यक्रमाच्या दुसर्या सत्रामध्ये विद्यार्थ्यांसाठी हँड्स ऑन प्रॅक्टिस घेण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः ऍक्रेलिक मटेरियल पासून सीएनसी प्रोग्राम तयार करून जॉब बनवले.विद्यार्थ्यांना स्वतः या गोष्टी करायला मिळाल्या त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कमालीचे उत्सुकता जाणवली.सदर कार्यक्रमाचे नियोजन प्रा. पंकज बोंडे व प्रा. प्रसाद मराठे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नीलम नारखेडे या विद्यार्थिनीने केले.