मन्यारखेडा येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

0
40

जळगाव राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत उपमुख्यमंत्री( गृह/विधी व न्याय) यांचे कार्यालय व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या समन्वयाने मन्यारखेडा येथे 21 सप्टेंबर रोजी मोफत सामुदायिक आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या शिबिरात विनामूल्य तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. शिबिरास सरपंच शालुबाई नामदेव पाटील, समाजसेवक तथा उप तालुकाप्रमुख शिवसेना शिंदे गट, राजूभाऊ पाटील, पिंटू भाऊ पाटील, उपसरपंच  ज्ञानेश्वर भाऊ पाटील , भाजपा जिल्हा कार्यकारणी सदस्य ईश्वरजी मराठे आणि मान्यवरांनी सदिच्छा भेट दिल्या.
शिबिरासाठी डॉक्टर उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय आणि धर्मदाय रुग्णालयाचे डॉ. रत्नेश जैन, स्त्रीरोग  विभागाचे डॉ. दीनानाथ राय, मेडिसिन विभागाचे डॉ. हर्ष पटेल, शल्य चिकित्सा विभागाचे डॉ. अपूर्वा गवई, नेत्ररोग  विभागाचे डॉ. संजोग , परिचारिका विभागाच्या परिचारिका आदी उपस्थित होते. तसेच रक्ताच्या चाचण्या करण्यासाठी फिंगलॅबचे  सागर सानप हेही उपस्थित होते.

Spread the love

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here