जळगाव – येथील डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरतर्फे निशुल्क योग शिबिर नुकतेच संपन्न झाले.
गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या वतीने संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, मेहरून येथे सात दिवसीय निशुल्क योग शिबिर नुकतेच संपन्न झाले. उद्घाटन समारंभ योगाचार्य ज्योतिबा यांच्या प्रेरणादायी उपस्थितीत पार पडला.
या शिबिराच्या आयोजनासाठी गोदावरी फाउंडेशनच्या आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हर्षल बोरोले आणि शाळेचे मुख्याध्यापक मुकेश नाईक यांनी अमूल्य योगदान दिले. कार्यक्रमात ज्योतिबा मॅडम आणि योग प्रशिक्षक डॉक्टर कोमल पाटील यांनी विद्यार्थ्यांना जीवनशैलीत योगाची महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट करून विशेष मार्गदर्शन केले.या शिबिरात 150 विदयार्थ्यांनी सहभाग नोंदवला यात योगाचे विविध प्रकाराबाबत मार्गदर्शन व प्रात्याक्षिक करण्यात आले.