डॉ केतकी ताई पाटील यांच्याद्वारे शिबिरार्थींची आस्थेवाईकपणे विचारपूस
जळगाव : राज्यस्तरीय विशेष वैद्यकीय मदत उपमुख्यमंत्री( गृह/विधी व न्याय) यांचे कार्यालय व गोदावरी फाउंडेशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जळगाव शहरात दोन दिवस मोफत सामुदायिक आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात तज्ञ् डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी करण्यात आली असून आवश्यकतेनुसार गोळ्या-औषधी हि देण्यात आली. या शिबिरांना स्वतः भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष डॉ केतकी ताई पाटील यांनी भेटी देऊन शिबिरार्थींची आस्थेवाईकपणे विचारपूस करून त्यांच्या शंकाचे निरसन केले.
शनिवार दिनांक 5 व रविवार दिनांक 6 ऑक्टोबर रोजी अनुक्रमे जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी येथे व खडके चाळ बहुउद्देशीय संस्था संचलित श्री गुरुदत्त उत्सव समिती मित्र मंडळ शिवाजी नगर येथे मोफत सामुदायिक आरोग्य शिबिर घेण्यात आले. शिबिरात रक्तदाब, मधुमेह तसेच रक्ताच्या विविध तपासण्या करण्यात आल्यात. याशिवाय नागरिकांना असलेल्या विविध शारीरिक व्याधी जाणून घेत तज्ञ् डॉक्टरांनी शंकांचे निरसन केले. या प्रसंगी खुद्द गोदावरी फाऊंडेशन संचालिका तथा भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष यांनी भेटी देऊन शिबिरांची माहिती घेतली. या प्रसंगी उपस्थित शिबिरार्थींचीही त्यांनी विचारपूस केली तसेच आयोजकांशी संवाद साधला. या शिबिराचा फायदा होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.